
प्रेमात माणूस काय करू शकतो? प्रेमाला सीमा असते का? भरभरून प्रेम करण्याला हद्द असते का? प्रेमाला आंधळंच का म्हणतात? मिळतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्ही ही गोष्ट वाचा. तुम्हाला स्वतःला समजेल की पुस्तकात,सिनेमात प्रेम असं का दाखवलं जातं. एका शाळेतील शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीशी लग्न केले. त्यासाठी या महिला शिक्षिकेने लिंगबदलाची शस्त्रक्रिया केलीये. होय. ही घटना राजस्थान मधली आहे. कधीही न ऐकलेली ही अनोखी घटना.
राजस्थानच्या भरतपूरमध्ये हा अनोखा विवाहसोहळा चर्चेत आहे. मीरा भरतपूर येथील शासकीय माध्यमिक शाळेत पीटी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
कल्पना नावाची एक विद्यार्थिनी या शाळेत शिकते. कल्पना ही कुशल कबड्डीपटू असून ती तीन वेळा राष्ट्रीय स्तरावर खेळली आहे.
शिक्षिका मीराला कल्पनाचा खेळ खूप आवडायचा. याच कारणामुळे शिक्षिका मीरा कल्पनाच्या प्रेमात पडल्या. शिक्षिकेने मीरासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. कल्पनानेही यावर प्रतिक्रिया दिली आणि त्यांचं प्रेम त्यांचं प्रेम कबूल केलं.
लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मीराने पुढाकार घेत लिंगबदलाचा निर्णय घेतला. त्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर मीरा आरव झाली.
कल्पना आणि आरव यांचं लग्न झालं. विशेष म्हणजे दोघांच्या घरच्यांनी याला विरोध केला नाही. आरवला चार मोठ्या बहिणी असून चौघांचेही लग्न झाले आहे.
आधी मीरा आणि आता आरव यांना महिला कोट्यातून सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. मीराची शाळेत कल्पनाशी ओळख झाली. कल्पना यांनीही लिंगबदलाचे समर्थन केले.
पण आता आरवने सांगितले की, नोकरीत नाव आणि लिंग बदलल्यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आरवच्या वडिलांनीही या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. “मला पाच मुली आहेत. धाकटी मीरा मुलगी असली तरी लहानपणापासून ती मुलासारखी राहत होती. आता तो मुलगाच आहे याचा मला आनंद आहे आणि त्याच्या लग्नामुळेही आनंद झाला आहे.”