AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला सहनच झालं नाही, तो इतका चिडला की एअरपोर्टवर त्याने थेट…VIDEO व्हायरल

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची सगळीकडे चर्चा आहे. जसप्रीत बुमराह एरवी शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी 20 सामन्यांची सीरीज सुरु आहे.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला सहनच झालं नाही, तो इतका चिडला की एअरपोर्टवर त्याने थेट...VIDEO व्हायरल
Jasprit Bumrah Image Credit source: PTI
| Updated on: Dec 18, 2025 | 10:04 AM
Share

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काल लखनऊ येथे होणारा चौथा T20 सामना रद्द झाला. त्यानंतर सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात बुमराहचा संयम सुटल्याच दिसत आहे. बुमराहला इतकी चीड आली की, त्याने समोरच्या व्यक्तीच्या हातातून फोन हिसकावून घेतला. बुमराहशी संबंधित हा व्हिडिओ एअरपोर्टवरचा आहे. तिथे तो रांगेत उभा होता. त्याचवेळी चाहत्याच्या एका कृतीने बुमराहचा पारा चढला.

बुमराहसोबत हा फॅन असं काय करत होता? हा प्रश्न आहे. एअरपोर्टवर तो चाहता सुद्धा रांगेत उभा होता. जेव्हा त्याने बुमराहला शेजारच्या रांगेत उभा असल्याच पाहिलं, तेव्हा त्याने विनापरवानगी सेल्फी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. बुमराहने आधी त्याला समजावलं असं करु नकोस. बुमराहने चाहत्याला व्हिडिओ बनवू नको म्हणून वॉर्निंग दिली. पण जेव्हा चाहत्याने ऐकलं नाही, दुर्लक्ष केलं. तेव्हा बुमराहचा संयम सुटला. त्याने चाहत्याकडून फोन हिसकावून घेतला आणि फेकून दिला.

जसप्रीत बुमराह आणि चाहत्यामध्ये काय बाचाबाची झाली?

चाहता – सर, मी तुमच्यासोबतच जाणार आहे.

बुमराह – तुझा फोन पडला, तर मला बोलू नकोस.

चाहता – काही हरकत नाही सर.

बुमराह – ठीक आहे.

त्यानंतर बुमराहने त्याचा फोन हिसकावून घेतला आणि फेकून दिला. हे सर्व व्हिडिओमध्ये दिसतय.

बुमराहच या सीरिजमध्ये प्रदर्शन कसं आहे?

जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या T20 सीरीजमध्ये टीम इंडियाचा भाग आहे. कटक येथे पहिल्या सामन्यात त्याने दोन विकेट काढले. मुल्लापूर येथे दुसऱ्या टी 20 सामन्यात एकही विकेट मिळाला नाही. तिसरा टी 20 सामना धर्मशाळा येथे झाला. बुमराह त्यात व्यक्तिगत कारणामुळे खेळू शकला नाही. लखनऊमध्ये होणारा चौथा टी 20 सामना रद्द झाला. आता सीरीजमधला पाचवा आणि अखेरचा टी 20 सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 19 डिसेंबरला होईल. जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा हुकूमी एक्का मानला जातो. त्याने आपल्या घातक गोलंदाजीच्या बळावर अनेक सामने एकहाती फिरवले आहेत.

कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...