रिलचा नशा, वर्गात पुरुष अन् महिला शिक्षकांत हाणामारी, ते दृश्य पाहून विद्यार्थी घाबरले
Teachers Fight On Reels: अवधेश तिवारी यांनी पोलिसांकडे तक्रारीत म्हटले आहे की, सपना शाळेतील वर्गात नेहमी रिल्स बनवते. त्यामुळे त्या गोष्टीचा व्हिडिओ मी करत होतो. त्यांचे लक्ष विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा रिल बनवण्याकडे जास्त असते.

Teachers Fight On Reels: सोशल मीडियावर युवा वर्ग चांगलाच सक्रीय आहे. या युवकांकडून रिल बनवण्यासाठी वेगवेगळे स्टंट केले जातात. ते धोकादायक स्टंट करताना अनेकांचा जीव सुद्धा गेला आहे. काही युवती बोल्डनेसच्या सर्व हद्दी पार करत रिल बनवतात. रिलची ही नशा शाळेपर्यंत आली आहे. शाळेतील महिला आणि पुरुष शिक्षकांत हाणामारी झाली. तो प्रकार पाहून विद्यार्थी प्रचंड घाबरले. अखेर या प्रकरणी चौकशीचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यामधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ही घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही शिक्षकांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
काय घडला प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रकुटमधील कुम्हारन पुरवा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सपना शुक्ला आणि अवधेश तिवार या दोन्ही शिक्षकांमध्ये हाणामारी झाली. अवधेश तिवारी यांनी सांगितले की, सपना शुक्ला शाळेत नेहमी रिल बनवत असते. त्यामुळे दुसरे लोक डिस्टर्ब होतात. ते आपल्या व्हिडिओमध्ये सपना शुक्लावर हाच आरोप लावत आहे. दुसरीकडे सपना शुक्ला यांनी तिवारी यांच्यावर अश्लिल व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे. त्याने लपून व्हिडिओ काढले. सपना यांचे लक्ष गेल्यावर त्यांनी अवधेश यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली. या प्रकारामुळे विद्यार्थी चांगलेच घाबरले होते. दोघांना रोखण्यासाठी इतर शिक्षकांना वर्गात धाव घ्यावी लागली.
अवधेश तिवारी यांनी पोलिसांकडे तक्रारीत म्हटले आहे की, सपना शाळेतील वर्गात नेहमी रिल्स बनवते. त्यामुळे त्या गोष्टीचा व्हिडिओ मी करत होतो. त्यांचे लक्ष विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा रिल बनवण्याकडे जास्त असते.
शाळा बनली आखाडा, महिला अन् पुरुष शिक्षकात हाणामारी pic.twitter.com/KXnpw810MJ
— jitendra (@jitendrazavar) August 15, 2024
दरम्यान, शाळेतील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच शिक्षण विभागाने प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. जे काही तथ्य समोर येणार आहे, त्यानुसार कारवाई करण्यात येईल. या प्रकारानंतर सपना शुक्ला सुट्टीवर निघून गेली आहे. प्राथमिक चौकशीत सपना शाळेत रिल बनवत असल्याचे समोर आले आहे.
