DMart, Zudio पेक्षा स्वस्त, मुंबईतील ही 3 ठिकाणं शॉपिंगसाठी खजिना, मुलींची असते प्रचंड गर्दी

महागड्या मॉल्समध्ये हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा मुंबईतील या तीन मार्केटला एकदा भेट द्या, कमी बजेटमध्ये मिळेल उत्कृष्ट सामान. पर्यटक सुद्धा या ठिकाणांहून करतात खरेदी.

| Updated on: Aug 07, 2026 | 5:45 PM
1 / 5
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये शॉपिंगसाठी अनेक आलिशान मॉल्स आहेत. मात्र कमी बजेटमध्ये दर्जेदार आणि ट्रेंडी वस्तू खरेदी करायच्या असतील तर मुंबईतील काही पारंपरिक बाजार आजही लाखो ग्राहकांची पहिली पसंती ठरतात.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये शॉपिंगसाठी अनेक आलिशान मॉल्स आहेत. मात्र कमी बजेटमध्ये दर्जेदार आणि ट्रेंडी वस्तू खरेदी करायच्या असतील तर मुंबईतील काही पारंपरिक बाजार आजही लाखो ग्राहकांची पहिली पसंती ठरतात.

2 / 5

विशेष म्हणजे, या बाजारांपर्यंत मुंबई लोकलने सहज पोहोचता येते. त्यामुळे प्रवासाचा खर्चही कमी होतो. जर तुम्ही मुंबईत शॉपिंगचा प्लॅन करत असाल तर या तीन ऐतिहासिक आणि स्वस्त बाजारांना नक्की भेट द्या.

3 / 5

कमी किमतीत स्टायलिश कपडे खरेदी करायचे असतील तर दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीट हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेकडो दुकाने असून येथे पुरुष, महिला आणि मुलांसाठी ट्रेंडी कपडे, वेस्टर्न आऊटफिट्स, टी-शर्ट, जीन्स, जॅकेट्स, शूज, बॅग्स आणि विविध फॅशन ॲक्सेसरीज अतिशय परवडणाऱ्या दरात मिळतात.

4 / 5

क्रॉफर्ड मार्केट, ज्याला महात्मा ज्योतिबा फुले मार्केट म्हणूनही ओळखले जाते, हे मुंबईतील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध बाजारांपैकी एक आहे. येथे कॉस्मेटिक्स, क्रोकरी, किचन वेअर, डेकोरेशन साहित्य, मसाले, ड्रायफ्रूट्स, विविध खाद्यपदार्थ तसेच ताजी फळे आणि भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

5 / 5

मुंबईतील M.J. मार्केट हे कापड, ड्रायफ्रूट्स, सजावटीच्या वस्तू, विविध व्यावसायिक साहित्य आणि घाऊक खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. अनेक व्यापारी आणि किरकोळ ग्राहक येथे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी येतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us