तुम्ही कधी विचार केलाय खारट बिस्किटाला डिझाईन का असते? मग ही बातमी नक्की वाचा !

| Updated on: Oct 31, 2022 | 8:27 PM

बहुतेकदा या बिस्किटांमध्ये लहान आणि गोलाकार डिझाईन्स असतात. परंतु या डिझाईन का असतात याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे. एका टिकटॉक स्टारने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

तुम्ही कधी विचार केलाय खारट बिस्किटाला डिझाईन का असते? मग ही बातमी नक्की वाचा !
खारट बिस्किटांना डिझाईन का असते?
Image Credit source: social
Follow us on

आपल्या आसपास अशा अनेक गोष्टी असतात, ज्याबद्दल जाणून घेण्यास आपण नेहमीच उत्सुक असतो. कधी कधी आपल्याला याची उत्तरे सापडतात तर कधी कधी हे प्रश्न अनुत्तरीच राहतात. असाच एक प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे तो खारट बिस्किटांबाबत. खारट बिस्किटांना काही ना काही डिझाईन असते. बहुतेकदा या बिस्किटांमध्ये लहान आणि गोलाकार डिझाईन्स असतात. परंतु या डिझाईन का असतात याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे. एका टिकटॉक स्टारने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

यासाठी बनवले जाते हे डिझाईन

खारट बिस्किटांचे हे गुपित टिकटॉकवरील @theritzcrackersofficial नावाच्या अकाऊंटवरून सांगण्यात आले आहे. खारट बिस्किटाच्या काठावरील डिझाइनचे काम या व्हिडिओत सांगण्यात आले आहे.

या डिझायनर कट्सच्या माध्यमातून चीजचे तुकडे करून बिस्किटांसोबत खाल्ल्याचे या टिकटॉक व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आतापर्यंत लोकांना असे वाटायचे की हे फक्त बिस्किट सुंदर दिसण्यासाठी आहे, पण तसे नाही. ते पिझ्झा कटरप्रमाणे चीजचे तुकडे कापण्यासाठी बनवले आहे, जेणेकरून ते बिस्किटाच्या वर व्यवस्थित फिट बसते.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओला 32 लाख व्ह्यूज

या व्हिडिओला टिकटॉकवर 32 लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर 50 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना लोकांनी सांगितले की, दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळते.

तर काही युजर्सने लिहिले आहे की, तुम्ही हा नवा प्रयोग केला आहे. काही युजर्स हे पाहून पूर्णपणे प्रभावित झाले, तर काही लोकांना असे वाटले की यामुळे बिस्किट तुटतील पण चीज कापले जाणार नाही.