पेंग्विनच्या गर्दीत एक सील लपलाय! नीट पाहिलं की सहज दिसतो, दिसला?

संपूर्ण फोटोमध्ये फक्त बर्फाच्छादित बेट आहे. इतक्या सगळ्या पेंग्विनमुळे हे कोडे सोडवणे अधिक कठीण आहे.

पेंग्विनच्या गर्दीत एक सील लपलाय! नीट पाहिलं की सहज दिसतो, दिसला?
find the seal
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 29, 2022 | 10:21 AM

आपण ऑप्टिकल भ्रम अनेक वेळा सोडवले असतील. काही भ्रम आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि काही आपल्या हुशारीबद्दल सांगतात. ही कोडी सोडवल्यानंतर लोक आपल्यावर जरा जास्तच विश्वास ठेवू लागतात. तथापि, बऱ्याच ऑप्टिकल भ्रमांचे निराकरण करणे इतके कठीण आहे की ते कितीही प्रयत्न करून सुद्धा सोडवणं शक्य नसतं. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये तुम्हाला भरपूर पेंग्विन दिसतील. या सगळ्याच्या मध्येच एक सील प्राणी सुद्धा लपलेला आहे. पण तो तुमच्या डोळ्यांना इतक्या सहजासहजी दिसणार नाही.

संपूर्ण फोटोमध्ये फक्त बर्फाच्छादित बेट आहे. इतक्या सगळ्या पेंग्विनमुळे हे कोडे सोडवणे अधिक कठीण आहे.

या फोटोत सील शोधण्याआधी तुमच्या फोनमध्ये 11 सेकंदाचा टायमर सेट करा. आता तुमच्यासमोर दोन आव्हाने आहेत, पहिली या गोंधळात टाकणाऱ्या फोटोतून सील शोधणे आणि दुसरे म्हणजे 11 सेकंदात या कामात यशस्वी होणे.फोटो पाहूनही फोटोत सील दिसत नसेल तर खालील फोटोमध्ये योग्य उत्तर पाहा…

Here is the seal

हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जर तुम्ही हे कोडे सोडवण्यात यशस्वी झाला असाल, तर अभिनंदन तुमचं डोकं आणि डोळे खूप तीक्ष्ण आहेत. मात्र हा ऑप्टिकल भ्रम सोडवणं खरंच कठीण आहे, त्यामुळे लोकांना (सोशल मीडिया यूजर्स) घामही फुटलाय.