VIDEO : रांगोळीवर चुकून डिलिव्हरी बॉयचा पाय पडला , पुढे जे त्याने केलं ते पाहून पार्सल घेणारी महिलाही भारावली

एका डिलिव्हरी बॉयने असं काही केलंय की त्याचे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. ज्या महिलेने ते पार्सल रिसिव्ह केलं आहे. त्या महिलेलाही सुखद धक्का बसला आहे, असं काय आहे त्यात?

VIDEO : रांगोळीवर चुकून डिलिव्हरी बॉयचा पाय  पडला , पुढे जे त्याने केलं ते पाहून पार्सल घेणारी महिलाही भारावली
diwali
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 5:38 PM

दिवाळी म्हटलं की दारासमोर रांगोळी काढली जाते. कोणी तासन् तास मेहनत घेऊन रांगोळी काढतं, तर कोणी आकर्षक डिझाईन काढून घराचा दरवाजा सजवतं. आता इतकी मेहनत घेऊन काढलेल्या रांगोळीवर कोणी पाय दिला, किंवा ती पुसटली तर संताप अनावर होतो. पण एका डिलिव्हरी बॉयने त्या रांगोळीसोबत असं काही केलंय की त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील दृष्टी नावाच्या महिलेने आपल्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहेय व्हिडिओमध्ये फ्लिपकार्टचा डिलिव्हरीवाला पार्सल घेऊन त्याच्या घरी येतो. तो बेल वाजवतो. त्यानंतर ती महिला दार उघडते आणि पार्सल कलेक्ट करून घरात जाते.

यानंतर डिलिव्हरी बॉय तिथून निघण्यासाठी वळतो.पण याच वेळी त्याचा पाय घराच्या प्रवेशद्वाराजवळ काढलेल्या रांगोळीवर पडतो.त्यामुळे रांगोळी विस्कटली जाते. पण यापुढे त्याने जे केलंय ते पाहून सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं आहे. रांगोळी खराब झाल्याचं लक्षात येताच हा डिलिव्हरी बॉय तिथून निघून गेला नाही. उलट तो खाली बसला आणि स्वत: च्या हातांनी विस्कटलेले रंग पुन्हा व्यवस्थित करू लागला. बराचसा भाग ठीक केल्यानंतर तो तिथून निघून गेला.

Loading...

 

 

काही वेळाने दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी ती रांगोळी विस्कटलेली जाणवली, रांगोळी कशी खराब झाली याचा शोध घेण्यासाठी त्यांनी दाराजवळ लावलेला सीसीटिव्ही चेक केला त्यात असं काही दिसलं की ज्यामुळे त्यांना सुखद धक्का बसला. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांनी त्या डिलिव्हरी बॉयचे आभार मानले. रांगोळी काढण्यासाठी त्यांनाी बराच वेळ मेहनत घेतली होती, अनोळखी व्यक्ती येऊन स्वत:हून ती ठीक करण्यासाठी थांबेल अशी अपेक्षाही नव्हती असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या डिलिव्हरी बॉयचे कौतुक होत आहे. काहींनी त्याच्या संस्काराचे कौतुक केले आहे. तर काहींनी अशा छोट्या कृतीतूनच माणूसकी दिसते असे म्हटले आहे. तर काहींनी नक्कीच त्याला बहीण असणार अशी मिश्किल टिप्पणी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us