
सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच आता अमेरिकेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेन्ड होत आहे. शिकागो शहरात एक नाट्यमय दृश्य पाहायला मिळाले. एका डिलिव्हरी बॉयने अमेरिकन बॉर्डर पेट्रोल एजंट्सच्या हातावर तुरी दिल्या. पोलिस त्याच्या मागे धावत होते, मात्र तो त्यांना न सापडता सायकलवर बसून वेगाने पसार झाला. जवळील एका व्यक्तीने हो व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. एका वाटसरूने ही घटना व्हिडिओमध्ये कैद केली आहे. या व्हडिओबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सायकलस्वार पोलिसांना ‘मी अमेरिकन नागरिक नाही’ असं सांगताना दिसत आहे. त्याचवेळी त्याचा खिशातून खाली पडतो. त्यावेळी एक एजंट त्याला म्हणतो की तुझा फोन खाली पडला आहे. त्यानंतर सायकलवर असणारा डिलिव्हरी बॉय फोन उचलण्यासाठी खाली वाकतो, त्यानंतर एजंट त्याच्याकडे धावतात आणि त्याचा पाठलाग करतात. मात्र हा तरूण आपल्या सायकलवरून वेगाने पसार होतो. मात्र काही वेळानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीवर काय आरोप आहेत याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
शिकागोमधील हा व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी बॉर्डर पेट्रोल एजंट्सची सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली. एका नेटकऱ्यांने लिहिले की, “मला माहित आहे की हे भयानक असेल, पण 20 लोक एका सायकलस्वाराला कसे पकडू शकले नाहीत?” दुसऱ्या एकाने विनोदाने म्हटले की, पोलिसांनी लष्करी उपकरणे घातल्यामुळे तो पळून जाऊ शकला. कारण उपकरणांचे वजन इतके जास्त आहे की एजंट्सला पळताना कसरत करावी लागत आहे.
EXCLUSIVE: Earlier today ICE agents chase after a man in downtown Chicago after he made verbal comments but no physical or threatening contact. The man was able to get away. pic.twitter.com/uOiHXSmQny
— Christopher Sweat (@SweatEm) September 28, 2025
शिकागोमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. इतरही नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. आणखी एकाने लिहिले की, पोलिसांच्या गणवेशामुळे त्याचा पाठलाग करता आला नाही. एजंट्सचा गणवेश डिझाइन करताना त्यांना धावता येईल की नाही याचा विचार कोणीही केला नसेल.’ आणखी एकाने म्हटले की, तो पळून गेला, मात्र ICE एजंट्सची फजिती झाली.