Viral : IPS अधिकाऱ्याने शेअर केलेल्या फोटोवर भन्नाट कमेंट्स, तुम्हीही एकदा फोटो पाहाच!

सोशल मीडियावर एका फोटोची जोरदार चर्चा होत आहे. हा फोटो पाहून हास्याचे फवारे उडत आहेत. या फोटोमध्ये नवरा भांडी घासत आहे.

Viral : IPS अधिकाऱ्याने शेअर केलेल्या फोटोवर भन्नाट कमेंट्स, तुम्हीही एकदा फोटो पाहाच!
Funny viral photo
| Updated on: May 19, 2021 | 11:34 AM

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात लोकांचा सोशल मीडियावरील ‘टाईमपास’ वाढला आहे. सोशल मीडियावर (Social Media) दररोज वेगवेगळे फोटो, व्हिडीओ अपलोड होत असतात. नवनव्या अॅपद्वारे ‘स्टाईलबाज’ फोटो-व्हिडीओ शूट करुन अपलोड केले जातात. इन्स्टाग्राम रिल्सबाबत (Instagram reels) तर बोलायलाच नको. एकदा का रिल्सवर क्लिक केलं की तुमचे 15 मिनिटे कधी गेलेत ते कळणारही नाही. दरम्यान, सोशल मीडियावर एका फोटोची जोरदार चर्चा होत आहे. हा फोटो पाहून हास्याचे फवारे उडत आहेत. (Funny viral photo on social media shared by IPS Dipanshu Kabra hilarious comments)

या फोटोमध्ये नवरा भांडी घासत आहे. तर त्याची पत्नी उभं राहून ‘जीवन में सफलता कैसे पाएं’अर्थात आयुष्यात यशस्वी कसं व्हावं हे पुस्तक वाचत आहे. पती-पत्नीच्या या फोटोवर अनेकांच्या कमेंट्स येत आहेत. सोशल मीडियावर या फोटोची जोरदार चर्चा आहे.

हा फोटो आयपीएस दीपांशू काबरा (IPS Dipanshu Kabra) यांनीही शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये आयुष्यात आणखी किती यश हवं असं लिहिलं आहे. त्यांच्या या कमेंटलाही जोरदार लाईक्स आणि शेअर मिळत आहेत. याशिवाय लोक आपआपल्या प्रतिक्रिया देत हा फोटो त्यांच्या वॉलवर, त्यांच्या टाईमलाईनवर शेअर करत आहेत.

आयपीएस दीपांशू काबरा यांनी शेअर केलेला फोटो 

संबंधित बातम्या   

VIDEO | लाईव्ह शोमध्ये Private Part ला हात लावण्याचा प्रयत्न, चहाटळ प्रेक्षकाला गायिकेकडून जन्माची अद्दल

VIDEO | समजदार व्हावं कुत्र्यासारखं, मालकीणीसोबत कुत्रा करतोय योगा; सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय हा व्हिडीओ

(Funny viral photo on social media shared by IPS Dipanshu Kabra hilarious comments)