VIDEO | समजदार व्हावं कुत्र्यासारखं, मालकीणीसोबत कुत्रा करतोय योगा; सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय हा व्हिडीओ

सोशल मीडियात असाच एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये कुत्रा चक्क त्याच्या मालकीणीसोबत योगा करताना दिसतोय. कोरोना काळात लोक योगाला अधिक महत्त्व देऊ लागलेत. (a dog is doing yoga with its owner; This video is making waves on social media)

VIDEO | समजदार व्हावं कुत्र्यासारखं, मालकीणीसोबत कुत्रा करतोय योगा; सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय हा व्हिडीओ
समजदार व्हावं कुत्र्यासारखं, मालकीणीसोबत कुत्रा करतोय योगा

नवी दिल्ली : चित्त्याची धाव आणि गरुडाच्या तीक्ष्ण नजरेवर कधीही शंका येऊ नये, असा डायलॉग तुम्ही कधी ना कधी ऐकलेलाच असेल. अशाच प्रकारे कुत्र्याच्या समजूतदारपणावर कुणी शंका घेतली तर त्या व्यक्तीला वेड्यात काढले जाऊ शकते. कुत्रा हा इमानदार प्राणी समजला जातो. त्याचे जो कोणी व्यक्ती पालनपोषण करतो, त्या व्यक्तीबाबत कुत्र्याचा नेहमीच प्रामाणिकपणा असतो. खाल्लेल्या मिठाला जागणे ही म्हण कुत्र्याच्या बाबतीत नक्कीच लागू पडेल. अनेकदा कुत्रा आपला मालक ज्या गोष्टी करतो, त्या गोष्टी करण्यासाठी एका पावलावर तयार असतो. मालकाच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण करायला कुत्र्याला आवडते. अशाच कृतींचे अनेक व्हिडीओज सोशल मीडियात व्हायरल होतात. अनेक पशूप्रेमींसाठी अशा प्रकारचे व्हिडीओ कुतूहलाचे व तितक्याच करमणुकीचे विषय असतात. सोशल मीडियात असाच एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये कुत्रा चक्क त्याच्या मालकीणीसोबत योगा करताना दिसतोय. कोरोना काळात लोक योगाला अधिक महत्त्व देऊ लागलेत. त्यातच या कुत्र्यालाही योगाचे महत्त्व कसे पटलेय ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (a dog is doing yoga with its owner; This video is making waves on social media)

विविध प्रकारचे योगा करतोय कुत्रा

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कुत्रा आपल्या मालकीणीसोबत विविध प्रकारचे योगा करीत आहे. महिला ज्या पद्धतीने योगासने करीत आहेत, अगदी तशाच प्रकारची योगासने कुत्रा करीत आहे. कुत्रा अशाप्रकारे योग करताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. कुत्र्याची योगासने पाहून अनेकजण सोशल मीडियात ‘लव्ह’च्या इमोजीच्या माध्यमातून प्रेमाचा पाऊस पाडताहेत. अनेकजण हा व्हिडीओ आपल्या मित्रमंडळींपर्यंत पाठवण्याची घाई करताहेत. आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ ट्विटर यूजर @RexChapman यांनी शेअर केला आहे. ज्यात त्याने हा कुत्रा योग करीत आहे, असे कॅप्शन लिहिले आहे. बातमी लिहीपर्यंत हा व्हिडीओ तब्बल 28 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावरूनच तुम्हाला हा व्हिडीओ किती मजेशीर आहे व किती लोकप्रिय झालाय, याची पुरेपूर कल्पना येईल.

कुत्र्याकडे बोट दाखवून मित्रमंडळींना टोमणे

कुत्रा योगा करताना पाहून अनेकांनी आपल्या मित्रमैत्रिणींना टोमणे मारण्यासही सुरुवात केली आहे. अनेकजण आपल्या विशिष्ट मित्रांना टॅग करून त्यांना योगा करण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. कोरोना काळात लोकांना फिट राहण्याची गरज आहे. अशावेळी डॉक्टर योगासने करा आणि स्वस्थ राहा, असा सल्ला देऊ लागले आहेत. आपल्याकडे ‘वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती नव्याने रुजू झाली आहे. त्यामुळे योगाची नितांत गरजही भासू लागली आहे. अनेकजण मात्र योगा करण्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करताहेत. जे लोक हा सल्ला गांभीर्याने विचारात घेत आहेत, ती मंडळी मित्रमैत्रिणींना योगा करण्याचा सल्ला देताना व्हिडीओतील कुत्र्याकडे बघा, असा फुकटचा सल्ला देऊ लागले आहेत. सोशल मीडियात ही धम्माल घडवून आणणारा हा व्हिडीओ बघायला, शेअर करायला काय हरकत आहे मग? (a dog is doing yoga with its owner; This video is making waves on social media)

इतर बातम्या

लस खरेदीच्या जागतिक निविदेसाठी केंद्राने एकसमान धोरण मसुदा जाहीर करावा : राहुल शेवाळे

Video: मुंबईला वादळ झोडपत होतं त्यावेळेस दीपिकासिंह काय करत होती? पावसात आग लावणारा Video