Xiaomi, Realme ला टक्कर, OnePlus बजेट स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

वनप्लसच्या (OnePlus) आगामी बजेट स्मार्टफोनला वनप्लस नॉर्ड CE 5G (OnePlus Nord CE 5G) असं नाव दिलं जाऊ शकतं.

Xiaomi, Realme ला टक्कर, OnePlus बजेट स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स
OnePlus Nord CE 5G
अक्षय चोरगे

|

May 18, 2021 | 11:41 PM

मुंबई : चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसच्या (OnePlus) आगामी बजेट स्मार्टफोनला वनप्लस नॉर्ड CE 5G (OnePlus Nord CE 5G) असं नाव दिलं जाऊ शकतं. ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, या फोनचे नाव आधी वनप्लस नॉर्ड N1 5G होते, परंतु आता या फोनला नवे नाव दिले जाणार नाही. हा फोन वनप्लस नॉर्ड N10 5G चं पुढील व्हर्जन असू शकतो, जो मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच झाला होता. (OnePlus Nord CE 5G will be next budget phone of company)

अलीकडेच, एका Max Jambor ने एका लीकमध्ये उघड केले आहे की, कंपनीने पहिल्यांदाच वनप्लस नॉर्ड CE 5G अशा नावाचा वापर केला आहे. परंतु CE चा नेमका काय अर्थ आहे, ही बाब अद्याप कळू शकलेली नाही. ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे की, या फोनचा वनप्लस 9 सिरीजमध्ये समावेश होणार नाही. या फोनचे नाव आधी वनप्लस नॉर्ड N1 5G असे होते. परंतु, अद्याप फोनबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्याचबरोबर असेही म्हटले जात आहे की, हा फोन भारतात लाँच केला जाण्याची शक्यता खूपच कमी आहे.

वनप्लस नॉर्ड N10 5G फक्त युरोप आणि उत्तर अमेरिकेत लाँच करण्यात आला आहे. वनप्लस नॉर्ड N10 5G बद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 6.49 इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 690 चिपसेट देण्यात आला आहे.

कसा आहे OnePlus Nord N10 5G?

या फोनच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास आपल्याला यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. एसडी कार्डच्या मदतीने फोनचं स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. डिव्हाइसमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, एक क्वाड कॅमेरा सेटअप आहे. सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

दमदार बॅटरी

नॉर्ड N10 5G अँड्रॉयड 10 वर आधारित ऑक्सीजन ओएस 10.5 आऊट ऑफ दी बॉक्सवर काम करतो. या फोनमध्ये 4300mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 30T फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत 21,990 रुपये इतकी आहे.OnePlus

इतर बातम्या

वीजेशिवाय चालणारे AC बाजारात, दर महिन्याला 4200 रुपयांच्या वीजबिलाची बचत करणार

Flipkart Electronic sale : सॅमसंग, रियलमी आणि पोकोच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत…

(OnePlus Nord CE 5G will be next budget phone of company)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें