Flipkart Electronic sale : सॅमसंग, रियलमी आणि पोकोच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

वॉलमार्ट अधिकृत फ्लिपकार्ट (Flipkart) त्यांच्या प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक सेल (Flipkart Electronic sale) आयोजित केला आहे.

Flipkart Electronic sale : सॅमसंग, रियलमी आणि पोकोच्या 'या' स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट
Flipkart
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 6:10 PM

मुंबई : वॉलमार्ट अधिकृत फ्लिपकार्ट (Flipkart) त्यांच्या प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक सेल (Flipkart Electronic sale) आयोजित करीत आहे. हा सेल कालपासून सुरू झाला आहे आणि 21 मे पर्यंत चालणार आहे. 5 दिवसांच्या या सेलदरम्यान ग्राहकांना अनेक गॅझेट्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सूट मिळू शकते. यात लॅपटॉप, स्मार्टफोन, इअरफोन, टीव्ही आणि इतर उत्पादनांचा समावेश आहे. (Flipkart Electronic sale : Discounts on samsung galaxy F62, Redmi 9 Power, and other smartphones)

ई-रिटेलर येथे 12 टक्के अतिरिक्त सूट देत ​​आहे. परंतु यासाठी आपल्याला एचडीएफसी बँक कार्डसह खरेदी करावी लागेल. येथे ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्सही मिळतील. सेलदरम्यान ग्राहक सॅमसंग गॅलेक्सी F 62 हा स्मार्टफोन 17,999 रुपयांच्या किंमतीवर खरेदी करू शकतात. या फोनची मूळ किंमत 29,999 रुपये आहे. स्मार्टफोनमध्ये Exynos 9825 प्रोसेसर आहे. त्यात 7000mAh बॅटरी देखील मिळते.

रेडमी 9 पॉवर स्वस्तात खरेदीची संधी

डिस्काऊंट घोषित करण्यात आलेल्या स्मार्टफोन्सच्या यादीतील दुसरा फोन रेडमी 9 पॉवर (Redmi 9 Power) हा आहे. या फोनमध्ये 6.53 इंचाची FHD+ स्क्रीन आहे. ग्राहक हा फोन 9,999 रुपये इतक्या किंमतीत खरेदी शकतात. फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या यादीमध्ये तुम्हाला ओप्पो A53s 5G (Oppo A53s 5G) हा स्मार्टफोनदेखील मिळेल. या फोनची किंमत 14,990 रुपयांपासून सुरू होते. हँडसेटच्या बेस मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे.

पोकोच्या स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट

दुसरीकडे, ग्राहक पोको X3 हा स्मार्टफोन 16,799 रुपयांत खरेदी करू शकतात. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये आपल्याला 48 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पोको एम 2 प्रो 13,999 रुपयांच्या सवलतीच्या दरात खरेदी करता येईल. डिव्हाइसमध्ये 33W फार्स्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

रियलमी चा 5G फोन सवलतीच्या दरात

रियलमी 30 प्रो 5G या स्मार्टफोनवरही डिस्काऊंट ऑफर देण्यात आली आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्शन 800 U 5G आहे जो 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येतो. हा फोन 24,999 रुपयांच्या किंमतीवर खरेदी करता येईल. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 64 मेगापिक्सल क्वाड कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर बातम्या

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत…

75 हजारांचा डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफरसह Motorola चा ढासू स्मार्टफोन खरेदीची संधी

सावधान! चुकूनही ‘हे’ CoWIN अ‍ॅप डाऊनलोड करु नका! अन्यथा डेटा हॅक होईल

(Flipkart Electronic sale : Discounts on samsung galaxy F62, Redmi 9 Power, and other smartphones)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.