सावधान! चुकूनही ‘हे’ CoWIN अ‍ॅप डाऊनलोड करु नका! अन्यथा डेटा हॅक होईल

काही ठग आता CoWin अ‍ॅपच्या बनावट एपीके फाइल्स (APK Files) तयार करून लोकांची फसवणूक करत आहेत. (fake CoWin Apps your data can hacked)

  • Updated On - 10:46 pm, Sun, 16 May 21 Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Follow us -
सावधान! चुकूनही 'हे' CoWIN अ‍ॅप डाऊनलोड करु नका! अन्यथा डेटा हॅक होईल
COWIN-app

मुंबई : देशभरात कोव्हिड -19 ची वाढती प्रकरणं लक्षात घेता सरकारने लसीकरणाची प्रक्रिया वेगवान केली आहे. अशा परिस्थितीत, लोकांना लसीकरणासाठी कोव्हिन (CoWIN) ॲपवर नोंदणी करण्यास सांगितले जात आहे. या अ‍ॅपद्वारे लोकांना लस घेण्यासाठीची नोंदणी करावी लागेल. परंतु आता याबद्दल एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काही ठग बनावट अ‍ॅपद्वारे लोकांची फसवणूक करत आहेत. (Do not ever download these fake CoWin Apps, your data can hacked in one click)

काही ठग आता CoWin अ‍ॅपच्या बनावट एपीके फाइल्स (APK Files) तयार करून लोकांची फसवणूक करत आहेत. कंप्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने नोंदणीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बनावट CoWin ॲपपासून लोकांना दूर राहण्यास सांगितले आहे. तसेच असे कोणतेही ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका किंवा त्यावर स्वतःची कोणतीही माहिती भरू नका, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाने याबाबत एक ऍडव्हायझरीदेखील जारी केली आहे.

CoWin अ‍ॅपद्वारे लोकांची फसवणूक

कोरोना महामारीच्या काळात फसवणूकीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत बनावट CoWin अ‍ॅपद्वारे लोकांची फसवणूक करणे सोपे झाले आहे. साथीच्या रोगाच्या काळात अनेक ठग लोकांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक करत आहेत.

भारतीय कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ठग नागरिकांना एसएमएसद्वारे 5 लिंक पाठवतात, त्यानंतर नागरिक कोणत्याही लिंकवर क्लिक करतात आणि एपीके फाइल डाउनलोड करतात. या फाईल्स डाउनलोड केल्यामुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा धोका वाढतो आणि यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही नागरिकाने अशा एपीके फाईल्स डाऊनलोड करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

या APK फाईल्स डाउनलोड करू नका

भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) सांगितले आहे की, जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला, ज्यात सांगितले असेल की, या लिंकवर क्लिक केल्यानंतर CoWin अॅप डाउनलोड होईल. किंवा त्यात असं म्हटलं असेल की, या लिंकवर क्लिक करून कोरोनावरील लसीसाठी नोंदणी करा, तर असे मेसेज तात्काळ डिलीट करा. तसेच त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका कोणतीही फाइल किंवा ॲप डाऊनलोड करू नका.

  • Covid-19.apk
  • Vaci__Regis.apk
  • MyVaccin_v2.apk
  • Cov-Regis.apk
  • Vccin-Apply.apk

संबंधित बातम्या

सामान्य एसीपेक्षा इन्व्हर्टर एसीला ग्राहकांची अधिक पसंती, जाणून घ्या यामागची कारणे

प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेपासून Battlegrounds Mobile India साठी प्री-रजिस्ट्रेशन सुरु होणार, जाणून घ्या सर्वकाही

(Do not ever download these fake CoWin Apps, your data can hacked in one click)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI