AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेपासून Battlegrounds Mobile India साठी प्री-रजिस्ट्रेशन सुरु होणार, जाणून घ्या सर्वकाही

जगातील सर्वात लोकप्रिय मोबाईल गेम म्हणजेच प्लेयर अननोन बॅटलग्राउंड (PlayerUnknown's Battlegrounds) भारतात परत येणार आहे.

प्रतीक्षा संपली! 'या' तारखेपासून Battlegrounds Mobile India साठी प्री-रजिस्ट्रेशन सुरु होणार, जाणून घ्या सर्वकाही
Pubg Battlegrounds Mobile India
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 23, 2021 | 9:55 PM
Share

मुंबई : भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले होते. काही दिवसांपूर्वी PUBG Mobile गेम आता भारतात परतणार असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हापासून हा गेम नेमका कधी लाँच होणार याची पबजी गेमच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, पबजी गेम भारतात परतणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा गेम नव्या नावासह लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. कंपनीने या गेमसंबधीचा ट्रेलर यूट्यूबवर शेअर केला आहे. त्यामुळे या गेमच्या प्रतीक्षेत असलेल्या गेमर्सच्या उत्सुकता वाढल्या आहेत. (Battlegrounds Mobile India : Pre-registrations will start from May 18 on Google Play Store says Krafton)

जगातील सर्वात लोकप्रिय मोबाईल गेम म्हणजेच प्लेयर अननोन बॅटलग्राउंड (PlayerUnknown’s Battlegrounds) किंवा पबजी मोबाइल (PubG Mobile) पुन्हा एकदा भारतात परत येणार आहे. हा गेम यावेळी नवीन नावासह लाँच केला जाणार आहे. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम डेव्हलपर क्राफ्टनने (KRAFTON) शेअर केले आहे की PUBG चं नवं नाव बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (Battlegrounds Mobile India) असं असणार आहे. कंपनी लवकरच हा गेम मोबाइल डिव्हाइसवर लाँच करू शकते. क्राफ्टनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया एक्सक्लूसिव्ह गेम इव्हेंट्स सारख्या आउटफिट्स आणि फिचर्ससप्रमाणे लाँच केला जाईल.

प्री-रजिस्ट्रेशन सुरु होणार

हा गेम कधी लाँच केला जाणार आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र कंपनीने या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने या गेमसाठीची प्री-रजिस्ट्रेशन लिंक लाईव्ह केली आहे. 18 मे 2021 पासून युजर्स या लिंकवर जाऊन गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करतील. एका प्रेस निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, यावेळी चाहत्यांसाठी बरेच रिवॉर्ड्स ठेवले जाणार आहेत, परंतु युजर्स या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करतील तेव्हाच त्यांना याचा फायदा घेता येईल. हे रिवॉर्ड्स केवळ भारतीय युजर्सपुरते मर्यादित असतील. ज्या वापरकर्त्यांना प्री-रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना Google Play store वर जाऊन प्री-रजिस्ट्रेशन बटणवर क्लिक केल्यानंतर नोंदणी करता येईल. गेम लाँच झाल्यानंतर युजर्स रिवॉर्ड्स क्लेम करु शकतील. हा गेम प्ले स्टोरवर प्री-रजिस्ट्रेशन उलब्ध आहे. तसेच हा गेम विनामूल्य असेल.

पालकांच्या परवानगीशिवाय गेम खेळता येणार नाही

क्राफ्टनने आपल्या प्रायव्हसी पॉलिसी डॉक्यूमेंटमध्ये सांगितलं आहे की, जे गेमर्स 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, त्यांना आपल्या पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागेल. म्हणजेच पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर न देता ही मुलं पबजी गेम खेळू शकणार नाहीत. ते या गेममध्ये साईन अपच करु शकणार नाहीत. पालकांच्या परवानगीनंतरच ही मुलं पबजी गेम साईन अप करु शकतील.

परंतु येथे कंपनीची सर्वात मोठी चिंता ही आहे की, गेमर्स जो फोन नंबर देतील तो फोन नंबर बरोबर असेल का? कारण कोणताही युजर कोणाचाही फोन नंबर देऊन कंपनीची फसवणूक करु शकतात. अशा परिस्थितीत, कंपनी त्याबद्दल काय विचार करतेय, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

नवा गेम खास भारतीयांसाठी

त्याचबरोबर, या गेमची स्वतःची एसपोर्ट इकोसिस्टम असेल जी टुर्नामेंट आणि लीगसह सुसज्ज असेल. हा गेम मोबाईल डिव्हाइसवर फ्रूी टू प्ले उपलब्ध असेल. दरम्यान, असे म्हटले जात आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया सध्या केवळ भारतीय बाजारातच लाँच केला जाईल. म्हणजेच हा गेम खास भारतीयांसाठीच असणार आहे. हा गेम लॉन्च होण्यापूर्वी प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध असेल. निर्मात्यांनी यामध्ये ट्राय कलर (तिरंगी) थीम दिली आहे, जेणेकरुन भारतीय युजर्स याकडे आकर्षित होतील.

युजर्सचा डेटा सुरक्षित

गेम लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने स्पष्ट केले आहे की, गेमरचा डेटा कुठेही पाठवला जाणार नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित असेल. त्याचबरोबर कंपनी सरकारच्या सर्व महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल. यात डेटा गोपनीयता आणि युजर्सच्या सुरक्षेचा समावेश असेल. कारण गेल्या सप्टेंबरमध्ये याच कारणास्तव या गेमवर भारतात बंदी घालण्यात आली होती.

जबरदस्त गेमप्ले

दरम्यान, PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार केली जाणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यासाठी कंपनी भारतात काही ठिकाणी लोकल कार्यालय सुरु केली जाणार आहे. कंपनी भारतात लोकल बिझनेससह गेमिंग सर्व्हिस देणार आहे.

Krafton Inc (PUBG Corporation ची पॅरेंट कंपनी) या कंपनीने भारतात 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक मनोरंजन, लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि आयटी इंडस्ट्रीसाठी असेल. PUBG Corporation च्या म्हणण्यानुसार ही कोणत्याही कोरियन कंपनीने भारतात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय प्लेअर्सना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी PUBG कॉर्पोरेशनने त्यांचा गेमिंग कॉन्टेंट अपडेट आणि अधिक अॅडव्हान्स केला आहे. भारतीय प्लेअर्सच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार नवा गेम कस्टमाईज करण्यात आला आहे.

कसा बनला पबजी गेम?

एक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.

हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.

संबंधित बातम्या

भारतात बॅन तरीही PUBG चा जगभरात डंका, 100 कोटींहून अधिक युजर्सकडून गेम डाऊनलोड

100 कोटींहून जास्त युजर्सनी डाऊनलोड केलेला PubG अद्याप ‘या’ दोन गेम्सच्या मागे

कन्फर्म! PUBG Mobile India लाँच होणार, हा घ्या पुरावा

बॅन झालेल्या PUBG ला पछाडत ‘या’ नव्या गेमचा जगभरात डंका, छप्परफाड कमाई

Made In India गेम्स Pubg ला पछाडणार? पाहा देशातील टॉप-5 गेम्स

(Battlegrounds Mobile India : Pre-registrations will start from May 18 on Google Play Store says Krafton)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?