AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीजेशिवाय चालणारे AC बाजारात, दर महिन्याला 4200 रुपयांच्या वीजबिलाची बचत करणार

तुम्ही जर या गरमीमुळे वैतागला असाल आणि तुम्हाला त्यापासून सुटका हवी असेल तर एसी (Air Conditioner) खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही.

वीजेशिवाय चालणारे AC बाजारात, दर महिन्याला 4200 रुपयांच्या वीजबिलाची बचत करणार
Solar Ac
| Updated on: May 18, 2021 | 7:28 PM
Share

मुंबई : तुम्ही जर या गरमीमुळे वैतागला असाल आणि तुम्हाला त्यापासून सुटका हवी असेल तर एसी (Air Conditioner) खरेदी करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. परंतु एसीची सर्वात मोठी समस्या म्हणजे विजेचा वापर आणि त्यामुळे वाढणारं वीजबिल. कोणताही सामान्य एसी घरी वापरण्यास सुरुवात केल्यास वीजेचं बिल 4000 ते 4200 रुपयांदरम्यान येतं. तुम्ही कितीही प्रयत्न केले तर त्यामध्ये फार तर 200 ते 300 रुपयांचा फरक पडू शकतो. (Buy Solar AC and save electricity bill of 4200 rupees every month)

पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला एक उत्तम उपाय सांगणार आहोत. यासह, आता आपण घरात हवा तेवढा एसीचा वापर करु शकाल आणि गगनाला भिडणारे वीज बिलदेखील येणार नाही. कारण आता सौर एसी (Solar AC) बाजारात दाखल झाला आहे. म्हणजेच हा एसी वापरण्यासाठी विजेची आवश्यकता नाही. हा एसी सौर प्लेटला (Solar Plate) जोडलेला आहे. परंतु एक अडचण आहे, ती म्हणजे हे एसी इलेक्ट्रिक एसीपेक्षा महाग आहेत, परंतु दीर्घकालीन पैसे वाचविण्यात ते आपली मदत करतात.

दर महिन्याला हजारो रुपयांच्या वीजेची बचत

बाजारात 1 टन, 1.5 टन आणि 2 टन क्षमतेचे सोलार AC उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार एसी खरेदी करू शकता. वीज बचतीच्या बाबतीत सोलार एसी स्प्लिट किंवा विंडो एसीच्या तुलनेत 90 टक्के वीजेची बचत करू शकतो. जर आपण सामान्य एसी वापरत असाल तर, तो दिवसाला 20 युनिट्स (15-16 तास एसी चालवल्यास) वीजेचा वापर करतो. याचाच अर्थ महिन्याला 600 युनिट्स वीज वापरतो. म्हणजेच केवळ एसीचं एक महिन्याचं वीजबिल हे 4,000 ते 4,200 रुपये इतकं होईल.

सौर एसीबद्दल बोलायचे झाल्यास हा एसी तुमची गरमी आणि अधिक वीजबिल दोन्हींपासून सुटका करतो. जर तुम्ही थोडी काळजी घेऊन सौर एसी वापरत असाल तर कदाचित तुम्हाला त्यासाठी 1 रूपयादेखील खर्च करावा लागणार नाही. म्हणजेच एकदा गुंतवणूक करा आणि वीज बिलाच्या टेन्शनपासून कायमचे मुक्त व्हा, अशी ही योजना आहे.

Solar AC किती रुपयांमध्ये मिळेल?

आजच्या काळात बर्‍याच कंपन्या सौर एसी बनवतात. वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादने जवळपास समान किंमतीची असतात. पार्ट्सविषयी बोलायचे झाल्यास, सौर एसीमध्ये सामान्य एसी सारखेच फीचर्स असतात. परंतु सौर प्लेट आणि बॅटरी स्वतंत्रपणे जोडली गेलेली असते. या एसीच्या किंमतीविषयी बोलायचे झाल्यास, 1 टन एसी (1500 वॅट सौर प्लेट) साठी 97 हजार रुपये, 1.5 टन एसीसाठी 1.39 लाख रुपये आणि 2 टन एसीसाठी 1.79 लाख रुपये खर्च करावे लागतील. हा खर्च आत्ता आपल्याला खूपच जास्त वाटू शकतो, परंतु या एसीमुळे दीर्घकाळापर्यंत तुम्हाला वीज बिलापासून आराम मिळू शकेल.

इथे तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेतली पाहिजे की, AC जितका जास्त क्षमतेचा (अधिक टन) असेल तितकी जास्त वीज त्यासाठी लागते. परिणामी अधिक सोलार प्लेट्सची आवश्यकता भासते. त्यामुळे अशा एसींची किंमतही वाढते.

सोलार एसी वीजेवरही चालवता येईल

सौर प्लेट इनव्हर्टर आणि बॅटरीशी जोडलेली आहे. सौर प्लेट सूर्यप्रकाशापासून उर्जा निर्माण करते, जी बॅटरी चार्ज करते. एसी या बॅटरीच्या उर्जावर चालतो. दुसऱ्या बाजूला जर एखाद्या दिवशी ढगांमुळे अथवा इतर कोणत्याही कारणांमुळे सौर प्लेटवर सूर्यकिरणे पडू शकली नाहीत तर घरातील वीजेच्या कनेक्शनसह तो एसी चालेल.

संबंधित बातम्या

एसीला 1 टन – 2 टन एसी का म्हणतात? जाणून घ्या सोप्या भाषेत सर्व माहिती

सामान्य एसीपेक्षा इन्व्हर्टर एसीला ग्राहकांची अधिक पसंती, जाणून घ्या यामागची कारणे

मस्तच! एसी असलेलं शर्ट पाहिलं का?, जिथे जाल तिथे थंडा थंडा कूल राहाल; कसं आहे शर्ट, किंमत किती? वाचा

(Buy Solar AC and save electricity bill of 4200 rupees every month)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.