एसीला 1 टन – 2 टन एसी का म्हणतात? जाणून घ्या सोप्या भाषेत सर्व माहिती

जवळपास 9 क्विंटलचा एक टन असतो. ग्रॅम ते किलोग्रॅम आणि क्विंटल हे देशांतर्गत मानक आहे, तर टन हे परदेशी मानक आहे. (Why is AC called 1 ton - 2 ton AC, know all the information in simple language)

एसीला 1 टन - 2 टन एसी का म्हणतात? जाणून घ्या सोप्या भाषेत सर्व माहिती
झिरो डाउन पेमेंट, नो कॉस्ट ईएमआय आणि कॅशबॅकसुद्धा

नवी दिल्ली : उन्हाळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, अंगाची लाहीलाही होतेय, मग नक्कीच आपल्या घरी एसी हवी असे वाटत असेल ना. आता तर कोरोना काळात अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु झालेय. अशा परिस्थितीत जर तुम्ही एसी विकत घेण्याचा विचार करत असाल तर एसीबाबत ही माहितीही नक्की जाणून घ्या. जेव्हा तुम्ही एसी खरेदी करायला जाता, तेव्हा आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आपल्याला कोणत्या ब्रँडचा एसी हवा आहे… विंडो एसी घ्या किंवा एसी स्प्लिट करा… तुमचे बजेट काय आहे… वगैरे. (Why is AC called 1 ton – 2 ton AC, know all the information in simple language)

जेव्हा आपण शोरूम किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा घरगुती उपकरणांच्या दुकानात प्रवेश करतो, तेव्हा विक्रेता आपल्याला एसी किती टनचा हवा आहे, हे नक्की विचारतो. आपण किती टन एसी घ्याल? 1 टन, 1.5 टन, 2 टन…? विक्रेत्याच्या या प्रश्नामुळे अनेकजण चक्रावून जातात. बर्‍याच लोकांना असे वाटते की इतके वजन असलेले एसीसुद्धा आहेत. एसी इतका वजनदार आहे का? मग विक्रेता तुमच्या शंकेचे निरसन करतो. एक लक्षात घ्यायाला हवे कि एसीचे वजन 1000, 1500 किंवा 2000 किलो नसते. मग एसीबाबत टन का विचारतात?

सर्वप्रथम समजून घ्या की टन म्हणजे काय?

टन हाही वजन मोजण्याचे एक मानक आहे. जवळपास 9 क्विंटलचा एक टन असतो. ग्रॅम ते किलोग्रॅम आणि क्विंटल हे देशांतर्गत मानक आहे, तर टन हे परदेशी मानक आहे. 1 टन अंदाजे 907.18 किलो असतो. तथापि, एसीच्या बाबतीत याचा अर्थ बदलतो.

एसीमध्ये टन म्हणजे काय?

जेव्हा आपल्याला किती टन एसी घेणार, असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही कि तुम्ही एसी किती टन वजनाचा घेणार आहेत? एसीचा टन म्हणजे आपल्याला एसीपासून मिळणारी शीतलता. म्हणजेच घर थंड करण्याची उर्जा. अधिक टनचा एसी म्हणजे त्या एसीची घर वा कार्यालयाचे वातावरण थंड करण्याची क्षमता अधिक असते.

सोप्या शब्दांत समजून घ्या

1 टन एसीचा सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास 1 टन बर्फ जेवढा थंडावा देतो, तेवढा थंडावा आपल्याला 1 टन एसीपासून मिळतो. 2 टन बर्फ जेवढा थंडावा देऊ शकतो, तितकाच थंडावा आपल्याला 2 टन एसीपासून मिळू शकतो. याचा थेट संबंध आपल्या खोलीच्या आकाराशी येतो. जर आपली खोली 10 बाय 10 म्हणजेच 100 चौरस फूट असेल तर आपल्यासाठी 1 टन एसी पुरेसे आहे. खोली 100 चौरस फूटांपेक्षा जास्त आणि 200 चौरस फूटांपेक्षा कमी असेल तर 1.5 टन एसी आवश्यक असेल. त्याचबरोबर 200 चौरस फूटपेक्षा जास्त खोलीसाठी 3 टन एसी घेणे अधिक योग्य ठरेल.

प्रत्येक एसीची एक मर्यादा असते

जर तुमची खोली 100 चौरस फूटांपेक्षा मोठी म्हणजेच साधारण 170 चौरस फूट असेल तर आपल्या घरात फक्त 1 टन एसी बसवून उपयोग नाही. तुम्हाला त्या एसीपासून पुरेसा थंडावा मिळणार नाही. दुसरीकडे, जर आपण 100 चौरस फूट खोलीसाठी 3 टन एसी खरेदी केला असेल तर तेदेखील योग्य नाही. यामुळे विजेचा अधिक अपव्यय होईल. (Why is AC called 1 ton – 2 ton AC, know all the information in simple language)

इतर बातम्या

स्वस्तात टाटा स्काय + एचडी आणि बिन्ज + सेटअप बॉक्स लावण्याची संधी, कंपनी देतेय एवढी सूट

पंख्याला तीन पाती का असतात? जाणून घ्या याचे उत्तर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI