AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरमाला घालताना वधूने असे काही केले की वर संतापला अन्…व्हायरल Video पाहताच बसेल धक्का

Viral Video Wedding Season | सध्या लग्नसराई सुरु असताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून खोडकर वधू आणि रागीट वर समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसणार आहे.

वरमाला घालताना वधूने असे काही केले की वर संतापला अन्...व्हायरल Video पाहताच बसेल धक्का
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 20, 2024 | 3:32 PM
Share

नवी दिल्ली, दि. 20 फेब्रुवारी 2024 | लग्न म्हणजे दोन जीव अन् दोन परिवाराचे मिलन असते. लग्नानंतर दोन्ही जण आपल्या नवीन संसाराला सुरुवात करतात. तुळशी विवाहानंतर पुन्हा लग्नसराई सुरु होते. सध्या लग्नसराई सुरु असताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून खोडकर वधू आणि रागीट वर समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसणार आहे. संजय त्रिपाठी नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘ज्यादा भाव खाने के नुक़सान’, असे कॅप्शन देऊन शेअर केलेल्या या व्हिडिओवर शेकडो जणांनी कॉमेंट व्यक्त केल्या आहेत.

काय आहे व्हिडिओत

सोशल मीडियावर वधू आणि वराचा वरमाला घालतानाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत वधू वराला वरमाला घालते. वर काही भाव न खाता सरळ उभा राहून वरमालेचा स्वीकार करताना दिसत आहे. त्यानंतर मात्र कठीण प्रसंग घडला आहे. वर जेव्हा वधूला वरमाला घालण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा वधू मागे वाकून जाते. दुसऱ्यांदा पुन्हा वर प्रयत्न करतो. पुन्हा खोडकर वधू मागे सरकताना दिसत आहे. लग्नासाठी आतूर झालेला वर पुन्हा तिसऱ्यांदा प्रयत्न करतो. परंतु वधू पुन्हा तोच प्रकार करते.

वर संतापतो अन्…

तिसऱ्यांदा वधू वरमाला स्वीकारताना भाव खाते. मग वराचा संताप वाढतो. रागाने तो वधूला ढकलून देतो वरमाला जागेवर फेकून देतो. डोक्यावर घातलेला फेटाही काढून फेकतो आणि संतापात निघून जातो. यावेळी घडलेल्या या प्रसंगामुळे लग्नात आलेले लोकही अचंबित झालेले दिसतात.

सोशल मीडियावर व्हायरल अन् कॉमेंट

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक कॉमेंट येऊ लागल्या आहेत. एक युजर म्हणतो, नाराज हो गया भाई, एकाने तर वर मूर्ख असल्याचे म्हटले आहे. एक युजर म्हणतो, व्हिडिओ पाहून मी माझे हास्य थांबवू शकलो नाही.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...