Ghost Patient च्या नावाने हा व्हिडिओ होतोय व्हायरल! हादरलंय इंटरनेट

| Updated on: Nov 22, 2022 | 2:04 PM

घटना पहाटे 3.26 वाजता घडली. ही घटना इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये.

Ghost Patient च्या नावाने हा व्हिडिओ होतोय व्हायरल! हादरलंय इंटरनेट
Ghost Patient
Image Credit source: Social Media
Follow us on

खरंच भूत असतं का? तुम्हाला कधी असं काही जाणवलं आहे का? अर्जेंटिनातील एका रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल होत आहे. यामध्ये एक गार्ड दिसत नसलेल्या व्यक्तीशी बोलताना दिसतोय. ‘घोस्ट पेशंट’च्या नावाने हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. 38 सेकंदाच्या या क्लिपमुळे इंटरनेट हादरलंय.

ही घटना ब्युनोस आयर्स येथील फिनोचियेटो सेनेटोरियम या खासगी केअर सेंटरमध्ये पहाटे 3.26 वाजता घडली. ही घटना इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये.

रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या 38 सेकंदाच्या क्लिपच्या सुरुवातीला काऊंटरच्या खुर्चीवर एक गार्ड बसलेला दिसत आहे. त्यानंतर हॉस्पिटलचा दरवाजा उघडतो. पण त्यातून काहीही येताना दिसत नाही.

पण व्हिडिओवरून असं वाटतंय की, जणू गार्ड त्याला पाहू शकतो. तो ताबडतोब आपल्या जागेवरून उठतो. मग तो डेस्कवरचा क्लिपबोर्ड उचलतो आणि ‘अदृश्य व्यक्ती’च्या दिशेने जातो.

व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये असं दिसून येतं की, थोड्या संभाषणानंतर गार्ड त्याला आत घेण्यासाठी लाईन डिव्हायडर काढून टाकतो. आता हा व्हिडिओ पाहून लोक अवाक झाले आहेत. कारण, फुटेजमध्ये गार्ड ज्या व्यक्तीशी बोलत आहे, ती व्यक्ती दिसतच नाही.

‘डेली स्टार’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एक दिवस आधीच अर्जेंटिनातील या केअर सेंटरमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. लोक आता या घटनेचा याच्याशी संबंध जोडत आहेत.

त्याचवेळी केअर सेंटरच्या प्रवक्त्याचं म्हणणं आहे की, दरवाजा खराब होता आणि रात्रभर अनेक वेळा उघडत राहिला.क्लिपबोर्ड पेपरवर गार्ड काहीतरी लिहिताना दिसला, मात्र रजिस्टरमध्ये कोणाचेही नाव नोंदवले गेले नाही, असेही या प्रवक्त्याने सांगितले आहे.

त्याचबरोबर व्हिडिओ पाहून रेडिटचे काही युझर्स म्हणतात की, हा खोडसाळपणाही असू शकतो. एका युझरने लिहिले की, “ही खरोखरच विचित्र घटना आहे. त्याचबरोबर आणखी एका युजरचं म्हणणं आहे की, गार्डचा हावभाव समजणं कठीण आहे. कदाचित तो मस्करी करत असेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)