VIDEO ला 18 लाखापेक्षा जास्त Like, ‘मौत का कुआं’मध्ये मुलीने अशी बाईक चालवली की, पाहून….
Viral Video :'मौत का कुआं'मध्ये एका मुलीने बाईक चालवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. तिने असा परफॉर्मन्स दिला की, प्रेक्षकांचे श्वास रोखले गेले.

‘मौत का कुआ’चा खेळ तुम्ही पाहिला असेल. बहुतांश गावागावात भरणाऱ्या जत्रांमध्ये हा ‘मौत का कुआं’ असतो. इथे कार आणि बाइक चालवून खतरनाक स्टंट दाखवले जातात. एकवेळ होती, देशात कुठेही मोठी जत्रा असली की तिथे मौत का कुआं असायचा. हा खेळ पाहण्यासाठी लोक खास लांबून-लांबून यायचे. सर्वसामान्यपणे या मौत का कुआंमध्ये पुरुष बाइक आणि कार चालवताना दिसायचे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, यात एक मुलगी बाइक चालवताना दिसतेय. तिने असा परफॉर्मन्स दिला की, प्रेक्षकांचे श्वास रोखले गेले. ‘मौत का कुआं’चा हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मौत का कुआंचा खेळ पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे. सगळ्यांच्या नजरा एका मुलीकडे लागल्या आहेत. बाइक घेऊन ती मुलगी आतमध्ये प्रवेश करते. मुलीने बाइक स्टार्ट केली. मौत का कुआंमध्ये येण्याआधी तिने प्रार्थना केली. त्यानंतर काहीवेळात मौत का कुआंच्या भितींवर बाइक पळवायला सुरुवात केली. वेगवान स्पीडमध्ये बाइक गोल-गोल फिरवताना मुलीचा आत्मविश्वास, बॅलन्सोबत स्टंट करताना दिसते. तिला पाहून लोक हैराण होतात. तिच्या चेहऱ्यावर भिती अजिबात दिसत नाही.
खाली पडली किंवा तिच्यासोबत काही दुर्घटना घडली असा भितीचा कुठलाही लवलेश तिच्या चेहऱ्यावर नव्हता. मुलीने आपल्या हिम्मतीने सर्वांच मन जिंकलं.
वेगवेगळ्या कमेंट
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म इंस्टाग्रामवर rider_shaktiman_no_1 नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आलाय. कोट्यवधीवेळा हा व्हिडिओ पाहण्यात आलाय. 18 लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाइक केलय. त्यावर वेगवेगळ्या कमेंट सुद्धा आहेत.
View this post on Instagram
सलाम आहे या मुलीच्या हिम्मतीला
व्हिडिओ पाहून लोकांनी कमेंट केलीय की, हा फक्त स्टंट नाही, साहस आणि आत्मविश्वास आहे. एका युजरने लिहिलय आजपर्यंत मौत का कुआंमध्ये मुलांनाच पाहिलं होतं. पण मुलीने सिद्ध केलं की, मुली कोणापेक्षा कमी नाहीत. दुसऱ्या युजरने लिहिलय, या व्हिडिओने हलवून सोडलं. सलाम आहे या मुलीच्या हिम्मतीला.
