Video: खड्ड्यात जा…चाहत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या! हार्दिक पांड्यासोबत नको तसं वागला

सध्या सोशल मीडियावर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत चाहता जे काही वागला ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

Video: खड्ड्यात जा...चाहत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या! हार्दिक पांड्यासोबत नको तसं वागला
Hardik Pandya
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 28, 2025 | 12:35 PM

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या स्वॅगची कायमच चर्चा असते. जबरदस्त चाहत्यांच्या फॉलोइंगमुळे हार्दिक जिथे जिथे जातो तिथे त्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी जमते. असेच काहीसे नुकताच मुंबईत घडले आहे. हार्दिक मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत होता. यावेळी काही चाहत्यांनी त्यांच्याबरोबर सेल्फी काढायला सुरुवात केली, पण हार्दिक घाईत होता. त्यामुळे काहीं बरोबर फोटो काढून तो आपल्या गाडीत बसायला निघाला. याचवेळी एका चाहत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. तो हार्दिकसोबत उद्धटपणे वागला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून हार्दिक बाहेर पडत होता. त्याने राखाडी रंगाचा शर्ट परिधान केला होता. हार्दिक थोडा घाईत असल्याचे दिसत होते. तरीही हार्दिक भोवती गर्दी केलेल्या चाहत्यांना सेल्फी देत होता. पण काही चाहते सेल्फी न मिळाल्याने निराश झाले. एक चाहता हार्दिकला रागात म्हणाला, ‘भाड़ में जा’ (खड्यात जा). मात्र व्हिडीओमध्ये त्या चाहत्याचा चेहरा दिसला नाही. पण ज्या पद्धतीने तो चाहता हार्दिकबरोबर उद्धटपणे वागला ते अतिशय चुकीचे होते. हार्दिकबरोबर घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्याने प्रतिक्रिया दिली नाही

हार्दिकसोबत मुंबईत जे काही घडले त्यावर भारतीय क्रिकेटरने संयमाने काम घेतले. हार्दिकसोबत चुकीचे वागणाऱ्या चाहत्याकडे त्याने दुर्लक्ष करत आपल्या गाडीकडे जाणे पसंत केले. हार्दिक केला आणि गाडीत जाऊन बसला. असे पहिल्यांदाच झालेले नाही. यापूर्वीही चाहत्यांनी हार्दिकबरोबर गैरवर्तन केले आहे. गुजरात टायटन्सपासून मुंबई इंडियन्समध्ये परत आलेल्या हार्दिक पांड्यासोबत चाहत्यांनी गैरवर्तन केले होते. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. स्टेडियममध्ये हूटिंगबरोबरच ऑफ फील्डही त्याच्याबरोबर गैरवर्तन केले होते. पण इतके घडूनही हार्दिकने नेहमी प्रमाणे संयम दाखवला आहे.

टी२० विश्वचषकाच्या तयारीत आहेत हार्दिक

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी केल्यानंतर हार्दिक पंड्या आता न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेबरोबर विश्वचषकाच्या तयारीत आहेत. टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे आणि हार्दिक स्क्वॉडमध्ये मुख्य ऑलराउंडर आहेत. न्यूझीलंडबरोबर पाच टी२० सामन्यांची मालिका जानेवारीमध्ये खेळली जाईल, तर टी२० विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.