हे तुमच्याही बाबतीत घडू शकतं… सुहागरात झाली, हनीमूनलाही गेली… लग्नाच्या 14 व्या दिवशीच नवरीने…

हरियाणातील पानीपत येथे एका तरुणाच्या प्रेमविवाहात धोका निर्माण झाला आहे. त्याची नववधू लग्नानंतर नगदी आणि दागिने घेऊन पळून गेली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वधूचा शोध सुरू आहे. नवरदेवाचे कुटुंब हादरले आहे. या घटनेने प्रेमविवाहांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून पोलिस तपास करत आहेत.

हे तुमच्याही बाबतीत घडू शकतं... सुहागरात झाली, हनीमूनलाही गेली... लग्नाच्या 14 व्या दिवशीच नवरीने...
वधूचं हे असं कसं वागणं?
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: May 29, 2025 | 1:36 PM

हरियाणाच्या पानीपतमध्ये एका तरुणाला लव्ह मॅरेजमध्येच धोका मिळाला आहे. त्याची अशा प्रकारे फसवणूक झालीय की तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. आपली प्रेयसी बायको बनल्यावर असं काही करेल याची त्याला स्वप्नातही कल्पना नसेल. लग्नानंतर नवरी नवरदेवाला सोडून पळून गेली. घरातील रोख रक्कम आणि दागिनेही घेऊन ती पळाली. नवरदेवाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता लुटारू नवरीचा शोध घेतला जात आहे.

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, नवरी न सांगताच कुठे तरी निघून गेली. तिचा फोनही लागत नाहीये आणि ती कुठे गेली याचा शोधही लागत नाहीये. येथील एका गावातील हे प्रकरण आहे. या ठिकाणी राहत असलेला रोहित (नाव काल्पनिक)चं लग्न नेहा (नाव बदललंय) सोबत झालं होतं. बरेलीच्या एका मंदिरात 14 मे रोजी दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर रोहित प्रचंड खूश होता. लग्नानंतर दोघे हनीमूनलाही गेले. 27 मे रोजी दोघे हनीमूनहून परत आले. पण त्याच दिवसापासून नेहा अचानक गायब झाली. ती परत आलीच नाही.

आम्ही नेहाचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. पण तिचा काहीच शोध लागला नाही. तिचा फोन बंद येत आहे. आम्ही तिच्या कुटुंबीयांनाही फोन केला. पण त्यांच्याकडूनही काहीच समाधानकारक उत्तर आलं नाही. आम्ही सर्व नातेवाईकांकडेही चौकशी केली. पण कुणालाच नेहाबाबतची माहिती नाही. जेव्हा आम्ही घरात थोडा शोध घेतला तेव्हा आमच्या घरातील दागिने आणि रोख रक्कमही गायब असल्याचं दिसून आलं. त्यामुळे नेहा आम्हाला चुना लावून पळून गेलीय, हे आमच्या लक्षात आलं, असं पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी सांगितलं.

तिचा हेतू माहीतच नव्हता

नवरीने लव्ह मॅरेज केलं होतं. लग्नानंतर ती आमच्यासोबत चांगल्या पद्धतीने राहत होती, असं नवरदेवाचं म्हणणं आहे. तिच्या वागण्या बोलण्यावरून ती असं काही करेल असं वाटलं नाही. तिच्यावर आमचा संशयही बळावला नाही. ती आमच्या सर्वांची काळजी घेत होती. हनीमूनला गेलो तेव्हा तर ती भलतीच खूश होती. पण तिने असं का केलं तेच कळत नाहीये, असं नवरदेव म्हणाला.

नवरीचा शोध सुरू

दरम्यान, याप्रकरणी पीडित कुटुंबाने गुन्हा दाखल केला आहे. आम्ही नवरीचा शोध घेत आहोत. तसेच तिच्या कुटुंबियांचीही चौकशी केली जाईल. सध्या तरी या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं.