या लग्नाच्या पत्रिकेच्या आत काय असेल बरं? तुम्हीच बघा

हे कार्ड पाहिल्यानंतर पाहुण्यांसह लोकांचे होश उडाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. school.days_ नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या लग्नाच्या पत्रिकेच्या आत काय असेल बरं? तुम्हीच बघा
wedding card
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 15, 2023 | 1:52 PM

जेव्हा एखाद्याच्या घरी लग्न ठरलेले असते, तेव्हा पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी लग्नपत्रिका प्रथम छापली जाते. काही लोकांना स्वस्त लग्नपत्रिका छापून वितरित करणे आवडते, तर काही असे असतात जे कार्डवर जास्त पैसे खर्च करतात. लग्नपत्रिकेत काही अनोख्या गोष्टीही जोडल्या जातात जेणेकरून कार्ड उघडल्यानंतर पाहुण्यांचे मन प्रसन्न होते. बऱ्याचदा सुका मेवा किंवा काही मौल्यवान भेटवस्तू लग्नाच्या कार्डसह पाहू शकता, परंतु आपण कधी असे कार्ड पाहिले आहे का ज्याच्यासह आपल्याला लिकरची बाटली देखील मिळते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळालं, जेव्हा एका व्यक्तीच्या घरी लग्नाचं कार्ड आलं तेव्हा त्याने ते उघडण्यासाठी आपला मोबाईल कॅमेराही ऑन केला आणि मग कार्ड उघडायला सुरुवात करताच लोकांना खूप उत्सुकता लागली.

आता पाहुण्यांसह लोक विचार करू लागले की लग्नाच्या कार्डच्या आत हे काय आहे? कार्ड उघडताच प्रथम तीन पाने दिसली, त्यात वधू-वरांची नावे, लग्नाचे ठिकाण आणि नातेवाईकांची नावे वगैरे लिहिली जातात. मात्र, अजूनही एक ट्विस्ट शिल्लक आहे.

त्या व्यक्तीने कार्डच्या आत ठेवलेली तीन पाने काढताच पुढील दृश्य वेगळंच होतं. लग्नपत्रिकेच्या आत दारूची एक छोटी बाटली ठेवली होती आणि त्यासोबत ड्रायफ्रूट्सही ठेवले होते.

हे कार्ड पाहिल्यानंतर पाहुण्यांसह लोकांचे होश उडाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. school.days__ नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत 23 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.