AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Old Notes: जुन्या, फाटक्या नोटा माथी मारल्या? चिंता नको, बँकेतून अशा बदला, अशी आहे प्रक्रिया?

Old And Torn Notes: अनेकदा व्यवहारात जुन्या आणि फाटक्या नोटा माथी मारल्या जातात. त्यामुळे आपण हिरमसून जातो. एकतरी ही नोट चलनात चालत नाही आणि आपल्याकडून कोणी ती घेत नाही. अशावेळी ही नोट थेट बँकेत जमा करता येते. काय आहे ती प्रक्रिया?

Old Notes: जुन्या, फाटक्या नोटा माथी मारल्या? चिंता नको, बँकेतून अशा बदला, अशी आहे प्रक्रिया?
जुनी आणि फाटकी नोट
| Updated on: Feb 22, 2026 | 5:00 PM
Share

Old And Torn Notes: अनेकदा आपल्या खिशात नोटा तशाच पडून राहतात. अथवा व्यवहारात वापरताना त्या फाटतात. जीर्ण होतात. अशा नोटा मग चुकून आपल्या माथी येतात. त्या कुठून आल्या हे पण कळत नाहीत, कारण एखाद्या बंडलमध्ये अथवा नोटांमध्ये त्या एकदम दडवल्या जातात. नोट हलकी जरी फाटकी असली, तिचा कोपरा फाटलेला असला. त्यावरील नोटेचा क्रमांक वा डिझाईन स्पष्ट दिसत नसेल तर अशा नोटा कोणीच घेत नाहीत. त्यातच नोटेचे दोन भाग झालेले असतील अथवा चिकट टेपने त्या चिकटवलेल्या असतील तर मग बाजारात या नोटांना कोणी हातही लावत नाहीत. या नोटा आपल्याकडून कोणी घेत ही नाही. अशावेळी या नोटा थेट बँकेत जमा करणे फायद्याचे ठरते.

फाटक्या नोटा अशा बदला

जर तुमच्याकडे एखादी नोट फाटकी अथवा खराब असेल तर चिंता करू नका अथवा ती दुसर्‍या कुणाच्या माथी मारण्याची कसरत करू नका. या नोटा सहज बँकेत बदलता येतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार, सर्व बँका फटक्या वा खराब नोटा स्वीकारतात. तपासणीनंतर तुम्हाला बँका तात्काळ नवीन नोट देतात. जेव्हा तुम्ही बँकेत पोहतात. तेव्हा बँक कर्मचारी नोटेची पडताळणी करतो. तिला दोन प्रकारच्या श्रेणीत ठेवतो. जर नोट केवळ मळकट वा जुनी असेल तर तिला सोईल्ड नोट म्हटले जाते. तर नोट फाटकी अथवा कोपरे तुटलेले असतील म्युटिलेटेड नोट या प्रकारात ही नोट ठेवली जाते. दोन्ही प्रकारात बँक तुम्हाला त्याच मुल्याची नवीन नोट देते.

अगोदर करा हे काम

या प्रक्रियेत काही गोष्टी लक्षात घ्या. नोटेवर दोन्ही बाजूचा क्रमांक स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. जर नोटेवरील क्रमांक पुसल्या गेला अथवा गायब झाला तर नोट बदलता येणार नाही. खोटी नोट नको, नकली नोट नको, बँक ती बदलून देणारच नाही उलट तुमच्यावर पोलीस कारवाई होईल. गुन्हा दाखल होईल. त्यामुळे नाहक असल्या भानगडीत अजिबात पडू नका. जर नोट दोन भागात फाटली असेल, तिचे दोन तुकडे झाले असतील तर दोन्ही तुकडे सोबत न्या. या नोटेला टेप लावू नका अथवा स्टॅपल करण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे नोटेचे डिझाईन वरखाली होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे तुम्ही तर नोट बदलणार असाल तर त्यासाठी बँक कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल करत नाही. अथवा तुम्हाला कमी मूल्याची नोट देत नाही. ज्या मूल्याची नोट तुम्ही दिली असेल त्याच मूल्याची नोट तुम्हाला मिळेल. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे जर फाटकी नोट तुमच्याकडे आली असेल तर चिंता करू नका. अगोदर ती नोट बँकेत जमा करून नवीन नोट घ्या. या प्रक्रियेसाठी कोणतेही अर्ज फाटे करण्याची गरज नाही.

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!