AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत देवगिरी बंगल्यावर, कारण काय?

| Edited By: | Updated on: Jun 16, 2026 | 10:35 PM
Share

महागाई दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचं महिन्याचं गणित चूकत आहे. आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. तर अभिजित दिपके यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे आज कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन करणार आहे.... . यासह देश विदेश, क्रीडा, मनोरंजनसह इतर क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Maharashtra News LIVE : शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत देवगिरी बंगल्यावर, कारण काय?

सीएनजी पीएनजी च्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. महागाईचे चटके सहन करणाऱ्या पुणेकरांना नैसर्गिक वायू दरवाढीचा फटका बसत आहे. पुणे परिसरात सीएनजीच्या दरात एक रुपयांची आणि घरगुती पाईप नॅचरल गॅस पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ झाली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे, नागपूरातील संविधान चौकात आज कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन होणार आहे. सोमवारी अभिजित दिपके यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे नागपूर पोलीस सतर्क झाले असून अतिरिक्त सुरक्षा तैनात असणार आहे. एवढंच नाही तर, नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळसाठी गेल्या दोन वर्षांपासून एसटी सेवा बंद आहे. बस नसल्याने खाजगी वाहनांच्या टपावर बसून घाटातून जीवघेणा प्रवास सुरू आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपयोजना नाही. यासह देश विदेश, क्रीडा, मनोरंजनसह इतर क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Jun 2026 07:47 PM (IST)

    शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत देवगिरी बंगल्यावर, कारण काय?

    शिंदे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीआधी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

  • 16 Jun 2026 07:00 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचं प्रसाद लाड यांना जेवणाचं निमंत्रण

    मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना जेवणाचं निमंत्रण दिलं आहे. प्रसाद लाड जालना आंतरवली सराटी इथे 19 जून रोजी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. या भेटीत हैदराबाद गॅझेटियर आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

  • 16 Jun 2026 06:38 PM (IST)

    कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात हिंदुत्ववाद्यांकडून घोषणाबाजी

    नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात हिंदुत्ववाद्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. हिंदुत्ववाद्यांकडून “जय श्री राम” अशा घोषणा देण्यात आल्यात. हे आंदोलनकर्ते अर्बन नक्षल असल्याचा घोषणबाजी करण्यात आली. तसेच मोदी विरोध करून आंदोलन खराब करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • 16 Jun 2026 06:10 PM (IST)

    जळगाव विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

    जळगाव विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. जळगाव विधानपरिषद निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात 7 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात 630 मतदार हे आपला हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच व्हीडिओग्राफी तसेच वेब कास्टिंग केलं जाणार आहे. सर्व बाबीवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

  • 16 Jun 2026 05:54 PM (IST)

    हे सरकार सुस्त आहे, मनोज जरांगे यांचा प्रसाद लाड यांना फोन…

    अधिकारी आणि सरकारची ही मिलीभगत आहे, अधिकारी नाही जनता महत्त्वाची आहे. हे दाखवण्याची धमक सरकारने दाखवली पाहिजे असे मराठा नेते मनोज जरांगे यांनी टीका केली आहे. सातारा- पंढरपूर रस्त्यावरील विहिरीत कार अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची आज जरांगे पाटील यांनी भेट घेतली आणि आमदार प्रसाद लाड यांना फोन करीत राज्य सरकारवर टीका केली आहे.

  • 16 Jun 2026 05:36 PM (IST)

     नाशिक विधान परिषद निवडणूक, नगरसेवकांसाठी सहलीचे आयोजन

    नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला मनमाड नांदगाव नगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी एका सहलीचे आयोजन केले आहे.  गोकुळ गीते यांचे बंड शमले नसल्याने मतदानाच्या वेळी दगा-फाटा होऊ नये यासाठी या सहलीचे नियोजन केल्याचे म्हटले जात आहे.

  • 16 Jun 2026 05:16 PM (IST)

    वेद पाठक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – निलेशचंद्र मुन्नी

    वेद पाठक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.जैन समाजाने सोसायटीची परवानगी घेऊनच पांढऱ्या पट्ट्या टाकल्या आहेत. कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झालेले नाही.जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे असे जैन मुनी निलेशचंद्र मुन्नी यांनी म्हटले आहे.

  • 16 Jun 2026 03:54 PM (IST)

    नांदेड – ठाकरे गटाकडून कर्जमाफीच्या प्रतिकात्मक जीआरची होळी

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीचा 2 जून रोजी सरकारने जीआर काढला आहे. यामध्ये अनेक जाचक अटी टाकून सरकारने केवळ बँकेची कर्ज वसूली मोहिम उघडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला. शेतकऱ्यांचा सरसकट सात बारा कोरा करावा या मागणीसाठी कर्जमाफी योजनेच्या प्रतिकात्मक जीआरची होळी आज जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

  • 16 Jun 2026 03:40 PM (IST)

    सातारा-सांगली विधान परिषदेच्या अनुषंगाने शिवसेनेची बैठक संपन्न

    सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकी दरम्यान महायुतीतील तिढा अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक आज साताऱ्यात पार पडली. या बैठकीत शिवसेनेच्या सर्व नगरसेवक सदस्य पदाधिकाऱ्यांचे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी जाणून घेतले. याबाबत हा सर्व अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असल्याचे ते म्हणाले.

  • 16 Jun 2026 03:23 PM (IST)

    नाशिक : नांदूर मधमेश्वर धरणात जलपर्णीचे साम्राज्य

    नाशिकच्या निफाड तालुक्यात गोदावरी, दारणा आणि कादवा या तीन नद्यांच्या संगमावर बांधण्यात आलेल्या नांदूर मधमेश्वर धरणामध्ये सध्या जलपर्णीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झाले आहे. धरणाच्या पृष्ठभागावर जलपर्णीचा घट्ट विळखा तयार झाल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी घेणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

  • 16 Jun 2026 03:05 PM (IST)

    धुळे : अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेलं आवर्तन बंद

    पाऊस लांबल्याने आणि दुष्काळी परिस्थिती असल्याने राज्य शासनाच्या वतीने सर्वच जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात येणार आवर्तन सोडू नये असे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यात असलेल्या अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेलो आवर्तन बंद करण्यात आले आहे. अक्कलपाडा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यावर मोठ्या प्रमाणात शेती असून सोडलेल्या आवर्तनामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असतो. मात्र यंदा हे पाणी सोडलं मात्र लगेच बंद केल्याने शेतकऱ्यांची अडचणी निर्माण झाली आहे.

  • 16 Jun 2026 01:55 PM (IST)

    माळशेज घाटात पिकअप चालकाची जीवघेणी स्टंटबाजी

    कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटात एका पिकअप चालकाने जीव धोक्यात घालून स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घाटातील तीव्र नागमोडी वळणांवर भरधाव वेगात वाहन चालवत चालकाने धोकादायक कसरती केल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

  • 16 Jun 2026 01:45 PM (IST)

    जळगावात RTO कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत आंदोलन सुरू

    जळगावात आरटीओ भागातील लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत आंदोलन सुरू झाले आहे. राज्यव्यापी बेमुदत आंदोलनामध्ये जळगाव प्रादेशिक परिवहन विभागातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. सुधारीत आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम तयार केलेले नाही. कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित यासह विविध प्रलंबित मागणीसाठी आंदोलन सुरू.

  • 16 Jun 2026 01:30 PM (IST)

    वंचितला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसची महत्त्वाची बैठक

    अमरावती विधान परिषद निवडणूकीच्या तोंडावर वंचितला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसची महत्त्वाची बैठक संपली आहे. वंचितला पाठिंबा देण्यासंदर्भात अजूनही ठोस कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काँग्रेस वंचितला पाठिंबा देण्याची शक्यता धूसर असल्याची विश्वसनिय सूत्रांची माहिती

  • 16 Jun 2026 01:15 PM (IST)

    राज्यभर RTO कर्मचाऱ्यांचा संप, पण बोरीवलीत कामकाज सुरळीत

    राज्यभरातील RTO कर्मचारी आज त्यांच्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. मात्र, मुंबईतील RTOने या संपापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बोरीवली RTO मध्ये नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असून संपाचा कोणताही परिणाम दिसून येत नाही.

  • 16 Jun 2026 12:55 PM (IST)

    अमरावती वि. परिषद निवडणूक प्रकरणी स्थानिक काँग्रेस नेत्यांची आज बैठक

    अमरावती वि. परिषद निवडणूक प्रकरणी स्थानिक काँग्रेस नेत्यांची आज बैठक. आज सकाळी 11 वा. अमरावतीत बैठक पार पडणार. वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत निर्णय होणार. अमरावती परिषदेसाठी काँग्रेसकडून हर्षजीत देशमुखांना उमेदवारी

  • 16 Jun 2026 12:45 PM (IST)

    कॉक्रोच जनता पार्टीचं आज नागपुरात आंदोलन

    कॉक्रोच जनता पार्टीचं आज नागपुरात आंदोलन. नागपुरातील संविधान चौकात आंदोलन होणार. नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. अभिजीत दिपकेंसह आंदोलनाच्या आयोजकांना पोलिसांची नोटीस. आंदोलनादरम्यान शांतता ठेवावी, आक्षेपार्ह वक्तव्य करू नये असे नोटीसीत नमूद. दरम्यान काल जयपूरमध्ये CJP चे संस्थापक अभिजीत दिपकेंवर हल्ला करण्यात आला होता.

  • 16 Jun 2026 12:30 PM (IST)

    ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं- उद्धव ठाकरे

    ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं… आजचा दिवस माझा नाही पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल…. खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची भूमिका…

  • 16 Jun 2026 12:15 PM (IST)

    पवनराजे हत्याकांड प्रकरणी कोर्ट 20 तारखेला अंतिम निकाल देणार

    पवनराजे हत्याकांड प्रकरणी कोर्ट 20 तारखेला अंतिम निकाल देणार… निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज…. कोर्टात न्यायाधीशांची माहिती… सर्व आरोपींना 20 तारखेला पुन्हा हजर राहण्याचे आदेश…. तब्बल 20 वर्षांनंतर लागणार निकाल…

  • 16 Jun 2026 11:57 AM (IST)

    वारणा मिल्क सेंटरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

    CSMT मेट्रो स्थानकावर वारणा मिल्क सेंटरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. “हे सेंटर कोल्हापूरमधील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे, एकप्रकारे देशातल इंजिनिअरींगच मार्वल म्हणून याकडे पाहू शकतो” असं मुख्यमंत्री म्हणाले.

  • 16 Jun 2026 11:44 AM (IST)

    सामान्य माणसाला हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाची फी कशी परवडणार? ओमराजे निंबाळकर

    “न्यायालयाकडून न्याय मिळावा एवढी अपेक्षा आहे. सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. माझी क्षमता होती म्हणून मी हायकोर्टात रीट दाखल करु शकलो. त्या आधारावर केस सीबीआयकडे गेली. सीबीआयने सर्व आरोपी समोर आणले. सामान्य माणसासाठी न्याय दुरापास्त आहे. आरोपी समोर आल्यानंतर 20 वर्ष अविरतपणे खटला सुरु आहे. सामान्य माणसाला हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाची फि कशी परवडणार?” असं ओमराजे निंबाळकर म्हणाले. ओमराजे त्यांचे वडिल पवनराजे निंबाळकर हत्याकांड खटल्याच्या विषयावर बोलत होते.

  • 16 Jun 2026 11:37 AM (IST)

    ठाकरेंच्या पक्षात काय सुरू आहे, याकडे आमचे लक्ष नाही – संजय शिरसाट

    ठाकरेंचे खासदार काय करत आहेत, त्यांच्याशी आमचं काही घेणं नाही. संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे, याकडे आमचे लक्ष नाही. आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही. कोणतेही बोलणे झाले नाही. आमच्याशी वैयक्तिक चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरे बोलतात ज्यांना जायचे आहे, त्यांनी जावे. कदाचित आता त्या खासदारांचा रोष असेल. पक्ष वाचवणे हा प्रयत्न केला पाहीजे असं संजय शिरसाट म्हणाले.

  • 16 Jun 2026 11:24 AM (IST)

    नाशिक विधान परिषद निवडणूक, वसंत गीते काय म्हणाले?

    “अजून आमचा काही निर्णय झालेला नाही. आमचा मतदार नोंदणीवर भर आहे. बहुतेक उद्या कोअर कमिटीची बैठक होईल. आम्ही उद्धव साहेब व राऊत साहेबांशी बोलून निर्णय घेऊ. महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायचं की नाही यावर निर्णय घेऊ” असं वसंत गीते म्हणाले.

  • 16 Jun 2026 11:10 AM (IST)

    पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी निकाल लांबणीवर

    पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी निकाल लांबणीवर. 19 तारखेला निकाल येणार. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप. तब्बल 20 वर्षांनी येणार पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी निकाल. सर्व आरोपींना 19 तारखेला हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश

  • 16 Jun 2026 10:55 AM (IST)

    शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी आम्ही मोर्चा काढला आहे – अंबादास दानवे

    छत्रपती संभाजीनगर येथे ठाकरेंच्या शिवसेनेने तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला.  शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी आम्ही मोर्चा काढला आहे.  शेतकऱ्यांना ही फसवी कर्जमाफी नको आहे. कर्जमाफीत अनेक अटी शर्ती लावण्यात आल्या आहेत.  शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो आहे, असं यावेळी अंबादास दानवे म्हणाले.

  • 16 Jun 2026 10:38 AM (IST)

    NEET पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतात टेलिग्रामवर तात्पुरती बंदी

    NEET पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतात टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. 22 जून पर्यंत टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर बंदी असेल. 21 जून 2026 रोजी नीटची पुनर्परीक्षा होणार आहे. त्यामुळे टेलिग्रॅमवरील मेसेज एडिटिंग फीचर ह 30 जूनपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.

  • 16 Jun 2026 10:33 AM (IST)

    रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यानं शिंपडलं गोमूत्र

    रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सचिवाने गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं. माऊली हळवणरांनी आंदोलनस्तळी गोमूत्र शिंपडलं. सरकारी कारखाने असतील, बँका, दूधंघ डबघाईला आणले, अशा लोकांच्या आंदोलनामुळे पंढरपूर अशुद्ध झालं होतं. या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन भाविकांची गैरसोय झाल्याचा आरोप करण्यात आला.

  • 16 Jun 2026 10:29 AM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.  सोन्याच्या दरात 500 रुपये तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण .  सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 912 रुपयांवर पोहोचले तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 59 हजार 560 रुपये इतके झाले आहेत.

  • 16 Jun 2026 10:20 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील 16 गावांमध्ये पाणीटंचाई..

    जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील 16 गावांमध्ये पाणीटंचाई असून खासगी 22 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

    जामनेर तालुक्यातील 6, अमळनेर तालुक्यातील 8 तर भुसावळ व पारोळा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा 16 गावांमध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे.  पाणीटंचाई सदृश्य गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी तसेच टँकर साठी 66 विहिरीचे अधिग्रहण देखील करण्यात आले आहे.

  • 16 Jun 2026 10:13 AM (IST)

    कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर रॅली

    कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर रॅली निघाली.  बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे.  क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर हा हा मोर्चा काढण्यात आला. अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या या ट्रॅक्टर रॅलीला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी परवानगी नाकारली.

  • 16 Jun 2026 10:01 AM (IST)

    खासदारांनी आई भवानीची शपथ घेतली- संजय राऊत

    नुकताच संजय राऊत यांनी म्हटले की, खासदारांनी बैठकीत आई भवानीची शपथ घेतली. प्रत्येक खासदारासोबत संवाद साधून उद्धव ठाकरे यांनी अडचणी जाणून घेतल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

  • 16 Jun 2026 09:50 AM (IST)

    शाळेत तोडफोड करून विद्यार्थ्यांचे परीक्षा पेपर फाडले

    बीडच्या गेवराई तालुक्यातील आहेर वाहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून वर्गात प्रवेश केला आणि वर्गातील बेंच, खुर्च्या, खिडक्यांची तोडफोड केली. तर विद्यार्थ्यांचे हजेरी रजिस्टर तसेच परीक्षा पेपर फाडून नष्ट केले आहेत. हा संपूर्ण प्रकार मुख्याध्यापक आणि शिक्षक शाळा सुरू करण्यासाठी आल्यानंतर उघडकीस आला. यापूर्वीही अशाच प्रकारे दोन वेळा शाळेचे कुलूप

  • 16 Jun 2026 09:40 AM (IST)

    जालन्याच्या जामवाडी येथील अपघातग्रस्त विहीर पुन्हा एकदा चर्चेत

    तांदूळवाडी येथील अपघातानंतर जालन्याच्या जामवाडी येथील अपघातग्रस्त विहीर पुन्हा एकदा चर्चेत. जालना नागपूर मुख्य महामार्गावर असलेल्या या विहिरीत 2021 मध्ये एका पाठोपाठ 2 कार कोसळल्याची घटना घडली होती. या अपघातामध्ये कार मध्ये असलेल्या 4 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला,5 वर्षानंतरही अपघात ग्रस्त विहीर बुजवण्याचं प्रशासनाकडून धाडस नाहीच!

  • 16 Jun 2026 09:30 AM (IST)

    तुकाराम मुंडे यांच्या कारवायांची धाराशिव जिल्ह्यामध्ये धास्ती

    दूध संकलन केंद्रावर धाड पडली अशा सोशल मीडियावरील खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका दूध संकलन केंद्र चालकांचे शेतकऱ्यांना आवाहन. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायामुळे दूध आणि खव्यामध्ये भेसळ करणाऱ्यांचे धंदे झाले बंद. तुकाराम मुंडे यांच्या कारवायामुळे प्रमाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव वाढवून मिळण्याची शक्यता. मार्केटमधील भेसळयुक्त दूध कमी झाल्याने ओरिजनल दुधाचा भाव वाढणार. कळंब येथील मराठवाडा दूध संकलन केंद्रातील एमडी आणि कर्मचाऱ्यांची संवाद

  • 16 Jun 2026 09:20 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील मोरगड गावात पाण्याची भीषण स्थिती

    नदीपात्रात झरा छोटा खड्डा खोदून तेथून पाणी काढण्याची गावकऱ्यांवर दुर्दैवी वेळ. मेळघाटातील मोरगड गावात येथे गेल्या ८ दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे सुमारे २ किलोमीटर दूर नदीपात्रात झरा (छोटा खड्डा) खोदून तेथून पाणी काढून पिण्यासाठी आणावे लागत आहे. यामुळे महिला, वृद्ध, लहान मुले व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • 16 Jun 2026 09:05 AM (IST)

    भाजप वॉर्ड अध्यक्षाविरोधात गंभीर आरोप

    भाजप वॉर्ड अध्यक्ष सूरज प्रतापसिंह देवडा यांच्याविरोधात गंभीर तक्रार. बारमधील तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार. विवाहित असूनही स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितल्याचा आरोप. बारमध्ये तरुणीवर 50 हजार रुपयांच्या नोटा उडवल्याचा दावा. पीडितेकडून लाखो रुपये उकळल्याचाही आरोप. गन दाखवून धमक्या दिल्याची तक्रारीत नोंद

  • 16 Jun 2026 08:57 AM (IST)

    पावसाअभावी निम्मा जून महिना कोरडाच…. पुण्यात यापूर्वी 2014 मध्ये हीच परिस्थिती…

    प्रतिकूल वातावरणामुळे एकीकडे मान्सूनचा प्रवास गेल्या आठवडाभरापासून कोकणातच रेंगाळ असताना पुण्यात यंदा पूर्व मोसमी पावसाने ही निराशा केली आहे. मान्सूनच्या आगमनाची संकेत घेऊन येणारा हा पाऊस यंदा जूनमध्ये बरसलाच नाही. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आयएमडी नोंदवही जूनच्या पहिल्या पंधरा दिवसात 0 पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 2014 मध्ये पुण्यातील परिस्थिती नोंदवण्यात आली होती.

  • 16 Jun 2026 08:50 AM (IST)

    पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनास मुदतवाढ…

    पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन आणि मोबदला स्वीकारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने येत्या 30 जून पर्यंतची मुदत दिली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

  • 16 Jun 2026 08:40 AM (IST)

    पाणी कपातीच्या काळात दक्षतेसाठी महापालिकेकडून पथके…

    पुणे शहर आणि परिसरात पाणी कपातीच्या काळात पिण्याचे पाणी वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावांवर वापरता येणार नसून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हा इशारा दिला दरम्यान शहराला कालपासून दिवसाड पाणीपुरवठा सुरू झाला असून पहिल्या दिवशी पाणी मिळाले नसल्याच्या तक्रारी फारशा आल्या नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

  • 16 Jun 2026 08:35 AM (IST)

    नाशिक – कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह परिसरातील एका ट्रॅव्हल कंपनीच्या गोदामाला भीषण आग

    कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह परिसरातील एका ट्रॅव्हल कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली आहे, आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. पण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आली आहे, मात्र  आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही

  • 16 Jun 2026 08:25 AM (IST)

     नागपुरात कोकरोच जनता पार्टीचे आज आंदोलन

    अभिजीत दिपके आज सकाळीच नागपुरात दाखल झाले आहेत.  संविधान चौकात दुपारी ४ वाजता  आंदोलन करण्यात येणार. केंद्रिय शिक्षण मंत्र्यांनी पेपर लीक प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची प्रमुख मागणी असणार. त्यापूर्वी १२ वाजता अभिजीत दिपके यांची  पत्रकार परिषद पार पडणार आहे.

  • 16 Jun 2026 08:20 AM (IST)

    रिसोड शहरातील हिंगोली मार्गावरील माणुसकी नगर येथे जुन्या वादातून एका व्यक्तीची हत्या…

    रात्री 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे समोर येत आहे.  भगवान सुभाष गायकवाड (वय 38) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  भगवान गायकवाड हे झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर दगड किंवा लोखंडी रॉडने वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे… मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

  • 16 Jun 2026 08:17 AM (IST)

    खोळंबलेला मान्सून दोन-चार दिवसात सक्रिय होऊन 20 जून पर्यंत विदर्भ व्यापेल अशी शक्यता

    खोळंबलेला मान्सून दोन-चार दिवसात सक्रिय होऊन 20 जून पर्यंत विदर्भ व्यापेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वर्धा,गोंदिया आणि ब्रह्मपुरी शहर उष्ण लाटेच्या विळख्यात असून सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धक 41.5, गोंदियात 40.4 तर ब्रह्मपुरीत 40.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. 21 जून पर्यंत विदर्भात तुरळक पाऊस आणि वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात साधारणतः 17 जून पर्यंत सक्रिय होणाऱ्या मान्सूनला मात्र यंदा विलंब होत आहे.

  • 16 Jun 2026 08:16 AM (IST)

    जलजीवन मिशनचे काम पूर्ण झाल्यानंतर भोकरदन तालुक्यातल्या आन्वा गावात कलश मिरवणूक

    भोकरदन तालुक्यातल्या अनवा या गावांमध्ये साडेतीन कोटी रुपयांची जलजीवन मिशनची योजना पूर्ण होताच गावकऱ्यांकडून गावांमध्ये भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांचाही सहभाग पाहायला मिळाला. जलजीवन मिशनचे पाणी मिळाल्याने गावकऱ्यांनी गावातील मारुती मंदिरात आणि शिव मंदिरात जाऊन अभिषेक केला आहे. मागच्या काही दिवसापासून आन्वा ग्रामस्थांना पाण्यासाठी दूर जावं लागत होतं मात्र अनेक वर्षाची पाणीटंचाईची समस्या संपल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे..

  • 16 Jun 2026 08:10 AM (IST)

    KDMC च्या कॉफी टेबल बुकवरून महासभेत वाद; आगरी-कोळी संस्कृतीचा उल्लेख नसल्याने संताप

    भूमिपुत्रांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही” असं म्हणत भाजप नगर सेवक मंदार टावरे आक्रमक झाले. अधिकाऱ्यांनी त्रुटी मान्य करत महासभेत दिलगिरी व्यक्त केली. वाढता वाद पाहता महापौर हर्षाली थवील चौधरी यांनी चौकशीसाठी समिती स्थापन करत पुस्तकाचे वितरणही तात्पुरते थांबवण्याचे आदेश दिले .

  • 16 Jun 2026 08:10 AM (IST)

    कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन गायवळ आयफोन देणारा रेकॉर्डवरील आरोपी

    गोवंडी देवनार परिसरातील रेकॉर्डवरील आरोपी सुमित कांबळे याने सचिन गायवळ याला दोन आयफोन उपलब्ध करून दिल्याची माहिती मिळत आहे. या फोनवर फेस आयडीची व्यवस्था केली होती याद्वारे सचिनने निलेश गायवळ यांच्याशी दोन वेळा संपर्क साधल्याचे समोर आला आहे. सचिन कडून मिळालेल्या माहितीनुसार निलेश गायवळ सध्या लंडनमध्येच असल्याची माहिती आहे.

  • 16 Jun 2026 08:05 AM (IST)

    वादानंतर महापालिकेच्या इंग्रजी शाळा आकांक्षा फाउंडेशन तीन वर्षासाठी चालवण्यास देण्यात येणार

    पालिकेच्या पाच इंग्रजी शाळा आकांक्षा फाउंडेशन ला यापूर्वी नऊ वर्षासाठी देण्यात येणार होता. त्यासाठी जवळपास 110 कोटी रुपये नऊ वर्षासाठी आकांक्षा फाउंडेशन ला महापालिका देणार होती. महापालिकेने निविदा काढल्यानंतर आकांक्षा फाउंडेशनचीच निविदा आल्याने वाद निर्माण झाला होता. महापालिकेकडून आता प्रायोगिक तत्त्वावर तीन वर्षासाठीच आकांक्षा फाउंडेशनला शाळा दिल्या जाणार आहेत इतर संस्थांनी ही सहभाग घेण्याचा आवाहन करण्यात आला आहे. महापालिकेकडून तीन वर्षात प्रतिवर्षी 12 कोटी रुपये आकांक्षा फाउंडेशन ला देण्यात येणार आहेत

  • 16 Jun 2026 08:03 AM (IST)

    पुणे विमानतळावर १५ मिनिटांपेक्षा जास्त वाहन थांबवल्यास ५०० रुपयांचा दंड

    पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी आलेली वाहने १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ पिकअप-ड्रॉप लेनमध्ये उभी राहिल्यास ५०० रुपयांचा दंड आकारण्याचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळताच नियम लागू होणार असून, वाढती वाहनांची गर्दी आणि कोंडी कमी करण्याचा उद्देश असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.

Published On - Jun 16,2026 8:01 AM

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक