AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nila Vikhe Patil: महाराष्ट्राच्या लेकीचा स्वीडनमध्ये डंका; स्वीडिश संसदेच्या खासदार नीला विखे पाटील कोण?

Nila Ashok Vikhe Patil Member of Parliament in Sweden: महाराष्ट्राच्या कन्येने स्वीडन या प्रगत देशाच्या संसदेत धडक दिली आहे. त्या स्वीडिश संसदेच्या खासदार झाल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जिल्ह्यातील लेकीमुळे राज्याचा युरोपमध्ये डंका वाजला आहे.

Nila Vikhe Patil: महाराष्ट्राच्या लेकीचा स्वीडनमध्ये डंका; स्वीडिश संसदेच्या खासदार नीला विखे पाटील कोण?
स्वीडिश संसदेच्या खासदार नीला विखे पाटील कोण? Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 20, 2026 | 7:49 AM
Share

राज्यातील राजकीय, साखर कारखाने आणि शैक्षणिक क्षेत्रात विखे पाटील कुटुंब आघाडीवर आहे. अहिल्यानगरमधील विखे पाटील घराण्यातील लेक नीला विखे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी झेप घेतली आहे. 41 वर्षीय नीला विखे पाटील स्वीडन या उत्तर युरोपातील देशातील खासदार झाल्या आहेत. 349 सदस्य असलेल्या संसदेत (Riksdag / Sveriges riksdag) खासदार म्हणून निवड झाली आहे. स्टॉकहोम शहर मतदारसंघातून त्यांनी नुकतीच निवडणूक जिंकली आणि त्या स्वीडनमध्ये खासदार झाल्या.

नीला विखे पाटील कोण?

आशियातील पहिला सहकारी साखर कारखान्याची मुहुर्तमेढ अहिल्यानगरमध्ये रोवली गेली. तिचे संस्थापक विठ्ठलराव विखे पाटील यांची पणती, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांची नात, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या नीला या कन्या आहेत. तर जलसंपदा मंत्री आणि मंत्रिमंडळ मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत.

स्वीडनमध्येच झाला जन्म

नीला यांचा जन्म स्वीडनमध्येच झाला. त्यांचे लहानपण अहिल्यानगरमध्ये गेले. त्यांनी स्वीडनमधील गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र, कायदा या विषयात पदवी आणि एमबीएचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्या स्वीडनमधील ग्रीन पार्टीसोबत दीर्घकाळापासून जोडलेल्या आहेत. माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात त्यांनी वित्त, कर आणि गृहनिर्माण खात्याशी संबंधित राजकीय सल्लागार म्हणून काम केले. स्टॉकहोम सिटी कॉन्सिलवर त्या नगरसेवकही होत्या.

नुकत्याच लागलेल्या स्वीडनच्या राष्ट्रीय निवडणुकीच्या निकालानुसार, डाव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षाने 349 पैकी 176 जागा जिंकून निसटते बहुमत मिळवले आहे. तर मावळत्या पुराणमतवादी सरकारच्या पारड्यात 173 जागा पडल्या आहेत. निला यांचा ‘ग्रीन पक्ष’ हा एक प्रमुख विरोधी पक्ष असून तो प्रामुख्याने पर्यावरणवाद, नवीकरणीय ऊर्जा आणि हरित राजकारणावर लक्ष केंद्रित करतो.

आजोबांना अभिमान वाटेल असे कार्य करायचंय

स्वीडनच्या संसदेचा भाग होताना आपल्याला आनंद होत आहे. ज्यांना मतदानाचा अधिकार नाही, त्यांचा आपण आवाज होऊ. मुलांचे कल्याण आणि पर्यावरण रक्षण या विषयांवर खासदार म्हणून आवाज उठवेल. आपण 15 वर्षांचे असताना आजोबांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प वाचायला लावला होता. त्यांना माझा अभिमान वाटेल असेच काम करायचे असल्याचा दृढनिश्चिय या विजयानंतर खासदार नीला अशोक विखे पाटील यांनी बोलून दाखवला. त्यांच्या या नवीन भरारीचे सर्वचस्तरातून मोठे कौतुक होत आहे.  राज्याच्या राजकारणाचा वारसा आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही ठसा उमटवेल अशी आशा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी