AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचे शक्तीशाली B-52 विमान कोसळले, मोठा हाहाकार,तब्बल इतक्यांचा मृत्यू..

इराण आणि अमेरिका युद्ध थांबले आहे. मात्र, यादरम्यानच अमेरिकेच्या लष्कराला मोठा दणका बसला. थेट मोठा भीषण अपघात झाला. अमेरिकेच्या हवाई दलातील B-52 बॉम्बर या विमानाचा अपघात झाला. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी अमेरिकेच्या सैनिकांसोबतच काही सरकारी कर्मचारी देखील विमानात होती.

अमेरिकेचे शक्तीशाली B-52 विमान कोसळले, मोठा हाहाकार,तब्बल इतक्यांचा मृत्यू..
B-52 bomber aircraft
| Updated on: Jun 16, 2026 | 8:08 AM
Share

अमेरिकेतून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. थेट अमेरिकेच्या लष्करात हाहाकार उडाला. दक्षिण कॅलिफोर्नियातील एडवर्ड्स एअर फोर्स बेसवरून उड्डाण केल्यानंतर अमेरिकेच्या हवाईतील B-52 हे मोठे विमान कोसळले. हे एक बॉम्बर विमान आहे. अमेरिकेच्या हवाई दलातील महत्वाचे विमान म्हणून याकडे बघितले जाते. धक्कादायक म्हणजे उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात विमान कोसळले. विमानातील एकही जण वाचू शकला नाही. हा अपघात इतका भीषण होता की, काही सेकंदात सर्व संपले. विमानात असलेल्या सर्व अमेरिकी ठार झाले. यापैकी एकही जण वाचू शकले नाही. अपघातानंतर मोठी आग विमानाला लागल्याची माहिती मिळतंय. ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी या विमानात 8 जण होते. अमेरिकेच्या हवाई दल तळाने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सोमवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:20 वाजता घडली.

ज्यावेळी हा विमान अपघात झाला, त्यावेळी विमान आपल्या नियमित मोहिमेवर होते. 8 अमेरिकी या विमानात होते. घटनेनंतर आगीच्या ज्वालांसोबतच मोठा धूर निघाला. एडवर्ड्स एअर फोर्स बेसचे कर्नल जेम्स हेस यांनी या अपघातानंतर पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, आज या हवाई तळावर एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 8 उत्कृष्ट अमेरिकन नागरिकांचा बळी गेला.

हा अपघात इतका भयंकर होता की त्यात कोणाच्याही वाचण्याची शक्यता नव्हती. विमानात लष्करी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कामगारही असल्याचीही माहिती त्यांनी दिली. हा विमान अपघात नक्की कसा झाला, याचा तपास केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही तांत्रिक कारणामुळे इतका मोठा आणि भयंकर अपघात झाला असावा.

तपासाला सुरूवात झाली असून 6 महिन्यापेक्षा जास्त काळ अपघाताचे कारण पुढे येण्यास लागण्याचा अंदाज आहे. कारण अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे विमान जळून खाक झाले. त्यामुळे तपास करणाऱ्या यंत्रणांपुढे मोठे आवाहन आहे. B-52 बॉम्बर विमान हवाई तळाच्या रडार आधुनिकीकरण कार्यक्रमात मदत करत होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानांवरील नियंत्रण सुटले आणि त्याला आग लागली. अपघातानंतर तात्काळ बचावकार्य राबवण्यात आले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी