AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची भीती तेच घडतंय! इराण अमेरिका शांतता करारात इस्त्रायल करणार खेळखंडोबा, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम शांतता करारा झाला. आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच इस्त्रायलला हा युद्धविराम शांतता करार मान्य नाही. इस्त्रायलने मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे काही खेळखंडाबा तर होणार नाही ना, याचा भीती जगात आहे.

जगाला ज्याची भीती तेच घडतंय! इराण अमेरिका शांतता करारात इस्त्रायल करणार खेळखंडोबा, थेट..
Netanyahu and Trump
| Updated on: Jun 15, 2026 | 1:44 PM
Share

मध्य पूर्वेत शांतता आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात 14 अटीनंतर शांतता करार झाला. गेल्या तीन महिन्यापेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू होते. इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम करार झाल्याचे जाहीर केले. त्यांनी होर्मुज खाडी सुरक्षित खुली केली जाईल आणि तात्काळ अमेरिकेची नाकेबंदी उठवली जाईल, असे जाहीर केले. मात्र, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम शांतता करारानंतर इस्त्रायलला मोठ्या मिरच्या लागल्या आहेत. या युद्धविराम शांतता कराराचा इस्त्रायलने विरोध केला. हेच नाही तर इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी तात्काळ डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याकरिता वेळ मागितला आहे.

इस्त्रायलला लेबनानच्या मुद्द्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करायची आहे. इस्त्रायलला काही दिवस युद्ध सुरू ठेऊन इराणचे तीनतेरा वाजवायचे आहेत. मात्र, या युद्धामुळे जागतिक बाजार पेठ अडचणीत आहे.अमेरिकेवर हे युद्ध संपवण्याकरिता मोठा दबाव होता. इराण आणि अमेरिका करारात दोन्ही देशांनी इस्त्रायलला सहभागी करून घेतले नाही. ज्यामुळे इस्त्रायलचा थयथयाट बघायला मिळतोय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कराराला उशिर करण्याचा आरोप इस्त्रायलवर केला. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवर नेतन्याहू यांना झाडले होते.आता इस्त्रायल या युद्धविराम शांतता करारात नक्की काय खेळखंडोबा करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच इस्त्रायलच्या या भूमिकेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलच्या पंतप्रधानांना इशारा देत म्हटले होते की, तुमच्या या वागण्यामुळे जग तुमचा व्देष करत आहे.

आता डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात बैठक कधी होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या युद्ध शांतता करारात अमेरिकेने काही इराणच्या अटी मान्य केल्या आहेत. इराणच्या तेलावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसणार आहेत. शिवाय त्यांचा विदेशातील पैसाही फ्रीज केला जाणार आहे. होर्मुज खाडीबद्दलही मोठा निर्णय झाला. मात्र, इस्त्रायलला हा युद्धविराम शांतता करार अजिबात मान्य नाही.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं