महिलेसोबत नाचायचा हट्ट! नाचताना उचलून त्याला असा काय गरा गरा गोल गोल फिरवला की पुन्हा तो नाचायचं नाव घेणार नाही

शेवटी ती महिला इतकी वैतागली की तिने त्याला उचलून घेतलं आणि इतकं गरागरा फिरवलं

महिलेसोबत नाचायचा हट्ट! नाचताना उचलून त्याला असा काय गरा गरा गोल गोल फिरवला की पुन्हा तो नाचायचं नाव घेणार नाही
rajasthani dance
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 11, 2022 | 4:47 PM

महिला डान्सर्सना स्टेजवर नाचताना पाहून काही तरुण मंडळी इतकी एक्साइट होतात की, त्यांच्यासोबत डान्स करण्यासाठी स्टेजवर चढतात. अशा वेळी कधी कधी त्या नृत्यांगणा सुद्धा तरुणांना कंटाळतात. आजकाल सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन महिला डान्स स्टेजवर परफॉर्म करत असताना एक पुरुषही स्टेजवर डान्स करायला आला होता. शेवटी ती महिला इतकी वैतागली की तिने त्याला उचलून घेतलं आणि इतकं गरागरा फिरवलं की आता काय तो पुरुष पुन्हा स्टेजवर नाचणार नाही असं दिसतंय.

हा व्हिडिओ ७ नोव्हेंबर रोजी ट्विटर हँडल @8PMnoCM शेअर केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – तो पुन्हा कधीही स्टेजवर डान्स करणार नाही.

ही क्लिप आतापर्यंत ६६ हजारांहून अधिक युजर्सनी पाहिली आहे. तर हजारो युझर्सनी ती लाइक केलीये. काही लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि लिहिले की यामुळे आता नृत्यावरील विश्वास उडाला आहे. त्याचबरोबर इतरांनी लिहिले की, त्याला चांगली वागणूक मिळाली.

ही क्लिप फक्त २५ सेकंदांची आहे ज्यात आपण दोन महिला पारंपारिक राजस्थानी पोशाखात स्टेजवर परफॉर्म करताना पाहू शकतो. पॅन्ट-शर्ट घातलेला एक तरुणही त्यांच्यात नाचताना दिसतो.

अचानक एक महिला डान्सर त्या मुलाला उचलून स्टेजवर गोल गोल फिरू लागते. या माणसाची अवस्था अशी होते की, तो ताठ उभाही राहू शकत नाही. गरागरा फिरवून झालं की चक्कर मारून काही जण येऊन त्या तरुणाला घेऊन जातात.