गिफ्टिंगचा बदलतोय ट्रेंड! हेल्दी फूडपासून खास अनुभवांपर्यंत, हटके गिफ्ट्सना वाढतेय पसंती

Gifting Trend: सणासुदीला गिफ्ट देण्यासाठी आता लोक आधुनिक पद्धतींचा अवलंब करत आहेत. यामध्ये आरोग्य आणि फिटनेसची काळजी घेणाऱ्या गिफ्ट्सचाही समावेश आहे. जाणून घेऊया, फेस्टिव्ह गिफ्टिंगची पद्धत काळानुसार किती बदलली आहे.

गिफ्टिंगचा बदलतोय ट्रेंड! हेल्दी फूडपासून खास अनुभवांपर्यंत, हटके गिफ्ट्सना वाढतेय पसंती
Gifting Trend
| Edited By: | Updated on: Nov 12, 2026 | 10:36 AM

सणासुदीला एकमेकांना मिठाई देण्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र, काळानुसार गिफ्ट देण्याच्या पद्धतीत बदल होताना दिसत आहे. आता लोक केवळ मिठाई किंवा चॉकलेट देण्याऐवजी हेल्दी आइटम, पर्सनलाइज्ड हॅम्पर्स आणि एक्सपीरियंस बेस्ड गिफ्टिंगना पसंती देत आहेत. सणासुदीला गिफ्ट देण्याची पद्धत नेमकी कशी बदलत आहे आणि कोणत्या नव्या आयडिया ट्राय करता येतील, जाणून घेऊया.

गिफ्टिंगचा हा एक नवा प्रकार आहे. यामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींना नेहमीच्या वस्तू देण्याऐवजी एखादा खास अनुभव दिला जातो. यामध्ये स्पा सेशन, कुकिंग वर्कशॉप, पेंटिंग क्लास, योगा सेशन किंवा आवडत्या ठिकाणी डिनर करण्याचा अनुभव गिफ्ट करता येतो. अशा काही अनुभवांच्या आठवणी दीर्घकाळ मनात राहतात.

Loading...

पर्सनलाइज्ड गिफ्ट्सनाही वाढती पसंती

आता बाजारातून कोणतेही सामान्य गिफ्ट खरेदी करण्याऐवजी लोक समोरच्या व्यक्तीची आवड लक्षात घेऊन वस्तू निवडतात. एखाद्याला पुस्तकांची आवड असेल तर त्याला बुक हॅम्पर, गार्डनिंगची आवड असेल तर प्लांट किट, तर फिटनेसची आवड असणाऱ्यांना फिटनेस एक्सेसरीज देता येतात. याशिवाय पर्सनलाइज्ड फोटो फ्रेम, कस्टमाइज्ड जर्नल आणि जुन्या आठवणींशी संबंधित गिफ्ट्सही लोकप्रिय होत आहेत.

या आहेत गिफ्टिंगच्या खास आयडिया

हेल्दी फूड हॅम्पर: नट्स, सीड्स, ड्रायफ्रूट्स आणि हर्बल टी यांचा समावेश असलेले हेल्दी फूड हॅम्पर देता येईल.
वेलनेस गिफ्ट बॉक्स: अरोमा डिफ्यूझर, रिलॅक्सेशन किट आणि सेल्फ केअरशी संबंधित उत्पादनांचा समावेश असलेला गिफ्ट बॉक्स निवडू शकता.

ग्रीन गिफ्टिंग : इनडोअर प्लांट्स, हर्ब गार्डन किट आणि छोट्या कुंड्या गिफ्ट करू शकता.

बुक हॅम्पर : पुस्तकांसोबत रीडिंग लॅम्प किंवा पर्सनलाइज्ड बुकमार्क देता येईल.

एक्सपीरियन्स व्हाउचर : स्पा, पेंटिंग वर्कशॉप, कुकिंग क्लास किंवा डिनरचा अनुभव देणारे व्हाउचर निवडता येईल.

फिटनेस गिफ्ट्स : योगा मॅट, रेसिस्टन्स बँड आणि फिटनेस अॅक्सेसरीज गिफ्ट करू शकता.
पर्सनलाइज्ड गिफ्ट्स: फोटो अल्बम, कस्टमाइज्ड कॅलेंडर आणि आठवणी जपणाऱ्या खास फोटोंचा संग्रह देता येईल.

गिफ्ट निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा

गिफ्ट महागडे असणे आवश्यक नाही, तर ते उपयोगी आणि समोरच्या व्यक्तीच्या आवडीनुसार असणे अधिक महत्त्वाचे आहे. हेल्दी फूड हॅम्पर देताना त्यातील पदार्थांची गुणवत्ता आणि वापरण्याची मुदत तपासून घ्यावी. त्याचप्रमाणे स्किन केअर किंवा वेलनेसशी संबंधित उत्पादने निवडताना त्या व्यक्तीची गरज आणि आवड लक्षात घेणे आवश्यक आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us