Viral : संकटातही विचलित न होता कसं पडायचं बाहेर? या Videoतून खूप काही शिकायला मिळेल

| Updated on: Jan 23, 2022 | 1:36 PM

एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होतोय. हा व्हिडिओ एका घोड्या(Horse)चा आहे, जो जीवनाचा सर्वात मोठा धडा देताना दिसत आहे.

Viral : संकटातही विचलित न होता कसं पडायचं बाहेर? या Videoतून खूप काही शिकायला मिळेल
दोन रेल्वेच्या मधून धावत असलेला घोडा
Follow us on

Inspiring Video of Horse : तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर माणूस कोणत्याही संकटाला खंबीरपणे तोंड देऊ शकतो, त्या संकटातून बाहेर पडू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवून माणूस आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. जीवनात अनेक वेळा अनेक कारणांमुळे आपण निराश होतो. आशा तुटते, मनोबल घसरतं, पण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो नेहमी पुढे असतो, योग्य मार्गावर चालतो आणि ध्येय गाठतो. हा धडा प्रत्येकासाठी आहे. हा धडा तुम्हाला कोणत्याही माणसानं द्यावा, हे गरजेचं नाही. एखाद्या प्राण्याकडूनही ते शिकता येतं. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होतोय. हा व्हिडिओ एका घोड्या(Horse)चा आहे, जो जीवनाचा सर्वात मोठा धडा देताना दिसत आहे.

विचलित न होता धावला

दोन गाड्यांमध्ये घोडा अडकला, पण अडचणींमुळे तो विचलित न होता ध्येयाकडे वाटचाल करत राहिला आणि अखेर या संकटातून तो बाहेर आला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की घोडा दोन ट्रेनमध्ये कसा अडकला आहे, पण इकडे-तिकडे लक्ष न देता तो सरळ धावत आहे आणि शेवटी एक ट्रेन गेल्यावर तो दुसऱ्या रुळावरून पळू लागला आणि याप्रमाणे त्याचा जीव वाचला.

ट्विटर हँडलवर शेअर

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिलंय, की 2 ट्रेनमध्ये घोडा अडकला. त्याला कसं धावायचं, हे माहीत होतं. मार्ग न बदलता धावत राहिला आणि शेवटी बाहेर पडला. जणू काही जीवनाचा धडा या छोट्याशा व्हिडिओमध्ये आहे. अडचणींच्या गर्तेत अडकून विचलित होऊ नका, फक्त स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात राहा.

व्हिडिओला लाइक्स आणि कमेंट्स

हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 45 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. तर 12 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकही केलंय. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर उत्तम कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की जरा जीवन संतुलित ठेवा, तर दुसऱ्या यूझरनं ही जीवन जगण्याची पद्धत आहे, पराभवानंतरच विजय’ अशी कमेंट केली आहे.

Video : गोरखा जवानाचा पारंपरिक खुकरी डान्स सोशल मीडियावर Viral

Rat and Snake fight : पिल्लाला वाचवण्यासाठी उंदरानं घेतला सापालाच चावा, Video Viral

Love is in the air : दोन मांजरींचा हा मजेदार Video सोशल मीडियावर होतोय Viral