Rat and Snake fight : पिल्लाला वाचवण्यासाठी उंदरानं घेतला सापालाच चावा, Video Viral

एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मादी उंदीर (Rat) आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सापासारख्या धोकादायक प्राण्याशी लढत आहे.

Rat and Snake fight : पिल्लाला वाचवण्यासाठी उंदरानं घेतला सापालाच चावा, Video Viral
उंदीर आणि साप
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 11:36 AM

Rat and Snake fight : आईचा दर्जा जगात सर्वात वरचा आहे मग आई मानव असो वा इतर प्राणी(Animals). आई (Mother) म्हणजे आईच असते जी आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. तिला फक्त मुलं महत्त्वाची असतात. ती त्याला भुकेलेला किंवा आजारी पाहू शकत नाही. मुलांना प्रत्येक क्षणी आनंदी पाहण्यासाठी आई कोणत्याही संकटासमोर भिंत बनून उभी असते. मुलांना दुखापत होऊ नये, कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये, यासाठी आई नेहमीच काळजी घेते. तुम्ही अशा अनेक किस्से ऐकले असतील, ज्यामध्ये मुलं अडचणीत येतात, पण आई त्यांना संकटातून बाहेर काढते. कधी कधी तर जीवही गमावावा लागतो. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मादी उंदीर (Rat) आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सापासारख्या धोकादायक प्राण्याशी लढत आहे. हा खूपच धक्कादायक व्हिडिओ आहे.

पिल्लू सुखरूप

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक साप उंदराच्या पिल्लाला तोंडात धरून पळवून नेत आहे, तर ती त्याला वाचवण्यासाठी सापाच्या मागं लागली आहे. ती सापाच्या शेपटीला जोरात चावते, त्यामुळे साप तिच्या पिल्लाला सोडून जातो. सुरुवातीला सापानं उंदराच्या पिल्लाला सोडलं नाही, पण त्यानंतर संतापलेल्या उंदरानं त्याला जोरात चावा घेतला. त्यानंतर साप त्या पिल्लाला सोडून गेला. पण तरीही उंदराचा राग शांत झाला नाही. तिनं सापाला दूरवर पळवून लावलं. या दरम्यान, साप आपल्या पिल्लाच्या आवाक्याबाहेर असल्याचं तिला वाटल्यानं ती आपल्या पिल्लाकडे परत आली, सुदैवानं तिचं पिल्लू सुखरूप आहे. नंतर ती त्याला घेऊन तिथून निघून जाते.

ट्विटर हँडलवर शेअर

हा व्हिडिओ IFS अधिकारी सुरेंदर मेहरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय. कॅप्शनमध्ये लिहिलंय, की अस्तित्व आणि जीवनासाठी संघर्ष ही निसर्गाच्या प्रत्येक प्रजातीची मूलभूत प्रवृत्ती आहे’. अवघ्या 50 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 7 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

यूझर्सच्या कमेंट्स

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरनं लिहिलं, की उंदीर आणि सापाच्या अप्रतिम हालचाली, तर दुसर्‍या यूझरनं ‘आई नेहमीच महान असते’ अशी कमेंट केली.

Love is in the air : दोन मांजरींचा हा मजेदार Video सोशल मीडियावर होतोय Viral

Bear Viral Video : गावात घुसले दोन अस्वल, गावकऱ्यांची पळापळ; मशाल घेऊन पिटाळून लावलं

Video : खबरदार, मोबाइलला हात लावला तर! सोशल मीडियावर Viral होतायत ‘हे’ बेडूक!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.