Bear Viral Video : गावात घुसले दोन अस्वल, गावकऱ्यांची पळापळ; मशाल घेऊन पिटाळून लावलं

Bear Viral Video : गावात घुसले दोन अस्वल, गावकऱ्यांची पळापळ; मशाल घेऊन पिटाळून लावलं
अस्वल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन जंगली अस्वल (Bear) ओडिशा(Odisha)तील एका गावात शिरताना दिसत आहेत आणि नंतर रहिवाशांनी त्यांचा पाठलाग केला.

प्रदीप गरड

|

Jan 22, 2022 | 5:50 PM

Bear Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन जंगली अस्वल (Bear) ओडिशा(Odisha)तील एका गावात शिरताना दिसत आहेत आणि नंतर रहिवाशांनी त्यांचा पाठलाग केला. मीडिया (Media) रिपोर्ट्सनुसार, ही घटना नबरंगपूर जिल्ह्यातील उमरकोट ब्लॉकमधील बुरजा गावातील आहे. रिपोर्टनुसार, एक अस्वल आणि त्याचं पिल्लू अन्नाच्या शोधात गावात घुसलं. विशेष म्हणजे हे गाव जंगलाच्या हद्दीजवळ असल्यानं भूक लागल्यानं अस्वल गावात शिरल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओमध्ये कुत्रे अस्वलाचा पाठलाग करताना आणि भुंकताना दिसत आहेत, तर काही लोक मशाल घेऊन त्यांचा पाठलाग करत आहेत.

ओडिशातील घटना

ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यातील उमरकोट ब्लॉकमधील एका गावात अस्वल फिरताना दिसलं. बुर्जा गावातून येणारी ही बातमी धडकी भरवतेय. उमरकोट शहराच्या केंद्रापासून हे गाव फक्त 5 किमी अंतरावर आहे. गावात भरदिवसा दोन अस्वल मुक्तपणे फिरताना दिसले. सुदैवानं, अस्वल जवळच्या मुतुर्मा जंगलात परतले. अस्वल कोणतीही इजा न करता जंगलात परतल्यानं या घटनेत गावकऱ्यांना सुटकेचा नि:श्वास टाकला. दोन जंगली अस्वल गावात घुसल्याचा आणि गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवल्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

गावाजवळच जंगल

काही लोकांनी आपल्या गावात अस्वलाला पाहिल्यानंतर आरडाओरडा करून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान गावात असलेल्या कुत्र्यांनीही त्यांचा पाठलाग सुरू केला. हातात मशाल घेऊन ते अस्वलाच्या मागे धावले. तेव्हा तो परत जंगलात गेला. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. गावात कोणालाही इजा झाली नाही, म्हणून गावातील लोकांना आनंद झाला. जवळच जंगल असल्यानं गावातील लोकांना वन्य प्राण्यांपासून नेहमीच धोका असतो. त्यांना खूप काळजी घ्यावी लागते.

Video : ओळखा पाहू हत्ती किती? Viral फोटो पाहून गोंधळात पडले यूझर्स

Video : खबरदार, मोबाइलला हात लावला तर! सोशल मीडियावर Viral होतायत ‘हे’ बेडूक!

Video | गटाराच्या आत लपले दोन भलेमोठे अजगर! अखेर गटार उखडून पाहा अजगराला कसं गोणित भरलं?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें