‘घरफोड्या अस्वलाची’ बुलडाण्यात दहशत, आठवडाभरात 10 ते 12 घरे फोडली

जंगलव्याप्त वरवंड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंपरखेड येथे वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे काही दिवसांपासून मानव आणि प्राणी संघर्षाच्या ठिणग्या पडत आहेत. अशातच गेल्या आठवडाभरापासून एक भला मोठा अस्वल रात्रीला गावात येऊन घरफोडी करुन घरातील अन्नधान्याची नासधूस करत आहे.

'घरफोड्या अस्वलाची' बुलडाण्यात दहशत, आठवडाभरात 10 ते 12 घरे फोडली
Pimparkhed Bear Story
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 9:06 AM

बुलडाणा : जंगलव्याप्त वरवंड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंपरखेड येथे वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे काही दिवसांपासून मानव आणि प्राणी संघर्षाच्या ठिणग्या पडत आहेत. अशातच गेल्या आठवडाभरापासून एक भला मोठा अस्वल रात्रीला गावात येऊन घरफोडी करुन घरातील अन्नधान्याची नासधूस करत आहे. त्यामुळे गावात या अस्वलाची दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर वन विभाग याकडे निष्काळजीपणा करत असल्याने स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय.

या अस्वलाने आतापर्यंत दहा ते बारा घरांमध्ये घरफोडी केली. त्याला तेल, कडधान्यसह खाद्यपदार्थांवर ताव मारण्याची चटक लागली असून ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान होत आहे. भयभीत झालेल्या गावकऱ्यांनी या “घरफोड्या” अस्वलाच्या बाबतीत वनविभागाकडे वारंवार तक्रार केल्या. एकदा तर अस्वलाला चार तास घरात बंद करुन वनविभागाला कळवले. मात्र, कर्मचारी आले नसल्याने ते अस्वल निघून गेले. त्यामुळे या गावातील एखाद्याचा जीव गेल्यावर वनविभाग दखल घेणार का, असा सवाल स्थानिकांकडून विचारला जातोय.

या गावामध्ये राहणारे सर्व नागरिक हे मजूर असून ते मोलमजुरीसाठी बाहेरगावी जात असतात आणि गावामध्ये म्हातारी माणसे हे लहान मुलांच्या शाळेसाठी त्यांच्यासोबत राहतात. अस्वल घराचे टिन पत्रे फाडून आणि दरवाजे तोडून घरात प्रवेश करत असल्याने गावात असलेले वृद्ध आणि लहान मुले खूप घाबरलेली आहेत. या अस्वलांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी गावातील नागरिकांनी आता गावाला संरक्षण भिंत बांधून द्यावी, अन्यथा गावचे पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी केलीये.

संबंधित बातम्या :

अपघात पाहताच थांबले, जखमी मुलाचा चेहरा रुमालाने पुसला, औरंगाबादेत डॉ. कराड यांनी दिला माणुसकीचा दाखला

डोक्यात धारदार शस्त्राने वार, शेतात तरुणाचा मृतदेह, इचलकरंजीत खळबळ

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.