डोक्यात धारदार शस्त्राने वार, शेतात तरुणाचा मृतदेह, इचलकरंजीत खळबळ

इचलकरंजी शहरात शहापूर लगत असणाऱ्या तारदाळ गावातील सांगले मळा शेतात ही घटना उघडकीस आली आहे. एका युवकाची शेतामध्ये डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन अज्ञातांनी हत्या केल्याचा आरोप आहे.

डोक्यात धारदार शस्त्राने वार, शेतात तरुणाचा मृतदेह, इचलकरंजीत खळबळ
कोल्हापुरात तरुणाची हत्या


इचलकरंजी : इचलकरंजी शहरात हत्येचे सत्र सुरुच असल्याचे दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तारदाळ येथे एका युवकाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. शेतात तरुण मृतावस्थेत सापडला होता.

इचलकरंजी शहरात शहापूर लगत असणाऱ्या तारदाळ गावातील सांगले मळा शेतात ही घटना उघडकीस आली आहे. एका युवकाची शेतामध्ये डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन अज्ञातांनी हत्या केल्याचा आरोप आहे. शहापूरमध्ये असणाऱ्या प्राइड इंडिया कारखान्याच्या लगत असणाऱ्या शेतामध्ये हा प्रकार घडला होता.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, सोलापुरात मेव्हण्याच्या मित्राची हत्या

याआधी, एसआरपीएफ जवानाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर वाद मिटवण्यासाठी आलेल्या तरुणाला जीव गमवावा लागला. सोलापुरात जवानाने मेव्हण्याच्या मित्राची गोळी झाडून हत्या केली होती. ऊसाच्या शेतातून पळून जात असताना पोलिसांनी आरोपीला पकडलं.

काय आहे प्रकरण?

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे हा प्रकार घडला. गुरुबा महात्मे असे एसआरपीएफच्या जवानाचे नाव आहे. नितीन बाबुराव भोसकर याची गुरुबाने गोळी झाडून हत्या केली. यामध्ये गुरुबाचे मेहुणे बालाजी महात्मे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

कसं पकडलं?

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मेव्हण्याच्या मित्रावर गोळीबार करणाऱ्या मुंबई येथील राज्य राखीव दलाच्या जवानाला पोलिसांनी पकडलं. ऊसाच्या शेतातून पळून जात असताना वैराग पोलिसांनी एसआरपीएफ जवानाला ताब्यात घेतले आहे.

आरोपीकडून फायर केलेले पिस्तूल, 26 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. गुरुबा महात्मे असे एसआरपीएफच्या जवानाचे नाव आहे. घरात वाद सोडवण्यासाठी आलेल्या मेव्हण्याच्या मित्राचा गोळी घालून जीव घेतला होता, तर मेव्हणा गंभीर जखमी झाला आहे.

संबंधित बातम्या :

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, सोलापुरात SRPF जवानाचा गोळीबार, एकाचा मृत्यू

साताऱ्यात जवानाची निर्घृण हत्या, मारहाणीत मृत्यूचा बनाव उघड, पत्नीसह भावजय अटकेत

नाशकात सुट्टीवर घरी आलेल्या जवानाकडून पत्नीची हत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI