पत्नीच्या चारित्र्यावर संशय, सोलापुरात SRPF जवानाचा गोळीबार, एकाचा मृत्यू

गोरोबा तुकाराम महात्मे असे गोळीबार करणाऱ्या एसआरपीएफ जवानाचे नाव आहे. नितीन बाबुराव भोसकर याची जवानाने गोळीबार करुन हत्या केली. गोळीबाराच्या घटनेत आणखी दोघे जण जखमी झाले आहेत.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, सोलापुरात SRPF जवानाचा गोळीबार, एकाचा मृत्यू
खेडमधील हत्येचे गूढ उकलले; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली वृद्धाची हत्या

सोलापूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन एसआरपीएफ जवानाने गोळीबार करुन एकाची हत्या केली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे ही घटना घडली. गोळीबाराच्या घटनेत आणखी दोघे जण जखमी झाले आहेत.

काय आहे प्रकरण

गोरोबा तुकाराम महात्मे असे गोळीबार करणाऱ्या एसआरपीएफ जवानाचे नाव आहे. नितीन बाबुराव भोसकर याची जवानाने गोळीबार करुन हत्या केली. यामध्ये बालाजी महात्मे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून संशयित आरोपी गोरोबा महात्मे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

साताऱ्यात जवानाची हत्या

याआधी, सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील जवानाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. जवानाच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच भावजय आणि मेहुण्याच्या साथीने हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. संदीप जयसिंग पवार यांचा अज्ञातांच्या मारहाणीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला होता.

साताऱ्यातील सैदापूर येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे जवान संदीप जयसिंग पवार हे गावी सुट्टीवर आलो होते. 27 डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी मारहाण करुन त्यांना जखमी केले, असा बनाव रचला होता. त्यानंतर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

मारहाणीचा बनाव पत्नीकडून 

याबाबत त्यांच्या पत्नीनेच अज्ञात व्यक्तीविरोधात वानवडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना हा गुन्हा उघड करण्यासाठी सूचना केल्या.

त्यानुसार एलसीबी पथकाने सदर गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन घरातील सदस्य, मयताचे नातेवाईक तसेच गावातील आजूबाजूचे लोक यांच्याकडे विचारपूस केली. चौकशी करताना घरातील कुटुंबीय काहीतरी माहिती लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला.

घरातील नातेवाईकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. तेव्हा जवान संदीप पवार यांच्या हत्येमध्ये त्यांची पत्नी, भावजय आणि मेहुणा यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता मयत संदीप पवार हे सुट्टीवर आल्यावर दारु पिऊन कुटुंबीयांना शिवीगाळ करत, मारहाण करत वारंवार त्रास देत असल्याचा दावा करण्यात आला.

संबंधित बातम्या :

साताऱ्यात जवानाची निर्घृण हत्या, मारहाणीत मृत्यूचा बनाव उघड, पत्नीसह भावजय अटकेत

पाणी पिण्याच्या बहाण्याने घर गाठलं, गर्भवती पत्नीची गोळी झाडून हत्या, वर्ध्यात जवानाची आत्महत्या

नाशकात सुट्टीवर घरी आलेल्या जवानाकडून पत्नीची हत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI