Video | एकाच वेळी दोन उंदीर गिळण्याचा प्रयत्न, दुतोंडी सापाचा दुर्मिळ व्हिडीओ एकदा पाहाच !

सध्या तर एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक दुतोंडी साप दाखवण्यात आला आहे. या सापाने केलेली करामत पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Video | एकाच वेळी दोन उंदीर गिळण्याचा प्रयत्न, दुतोंडी सापाचा दुर्मिळ व्हिडीओ एकदा पाहाच !
Two Headed Snake

मुंबई : साप या सरपटणाऱ्या प्राण्याची सर्वांनाच भीती वाटते. सर्वच साप विषारी नसतात. मात्र, असे असले तरी बहुतांश लोक साप पाहिला की घाबरतात. सापाने दंश केल्यावर आपला मृत्यू होईल अशी भीती या लोकांना असते. याच कारणामुळे सोशल मीडियावर सापाचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या तर एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक दुतोंडी साप दाखवण्यात आला आहे. या सापाने केलेली करामत पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. (two headed snake swallowing two rats at one time)

एकाच वेळी दोन उंदरांना गिळंकृत करण्याचा सापाचा प्रयत्न

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा विशेष आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक दुतोंडी साप दाखवण्यात आला आहे. दोन तोंड असलेले साप अपवादानेच आढळतात. म्हणूनच व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेला दुतोंडी साप हा विशेष आहे. या व्हिडीओमध्ये सापाने एकाच वेळी दोन उंदरांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या दोन्ही तोंडांनी एकाच वेळी दोन उंदीर खाण्याचा प्रयत्न हा दुतोंडी साप करतो आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

सापाची धडपड कॅमेऱ्यात कैद

व्हिडीओमध्ये एका दुतोंडी सापाच्या दोन्ही तोंडामध्ये दोन वेगवेगळे उंदीर आहेत. दुतोंडी साप या दोन्ही उंदरांना खाण्याचा प्रयत्न करतो आहे. दोन्ही तोंडामध्ये उदरांना पकडून तो एकाच वेळी दोन्ही उंदीर फस्त करत आहे. त्यासाठीची सापाची धडपड कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. सुरुवातीला हा साप पाहून प्रत्येकालाच भीती वाटेल. पण नंतर या सापाने केलेली करामत पाहून नंतर सगळेच अवाक् झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एक साप दोन तोंडाने दोन उंदीर कसा खाऊ शकतो, हे आश्चर्यकारक आहे, अशी एकाने प्रतिक्रिया दिली आहे. तर काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ अद्भूत असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला snakebytestv या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. या व्हिडीओला लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | तरुणीला वाटलं तो शाहरुखसारखा धावत येईल, तिने प्रियकराकडे पाठ केली अन् घोळ झाला, व्हिडीओ पाहाच !

Video | खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी हत्तीची धडपड, पण ऐनवेळी गावकरी आले, पुढे काय झालं ? एकदा पाहाच

VIDEO : आई शिकवत होती छोट्या मुलाला पोहायला, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा पाराच चढला; वाचा का?

(two headed snake swallowing two rats at one time)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI