Video | तरुणीला वाटलं तो शाहरुखसारखा धावत येईल, तिने प्रियकराकडे पाठ केली अन् घोळ झाला, व्हिडीओ पाहाच !

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हासुद्धा असाच खळखळून हसवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीला प्रियकरावर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवणे जास्तच भोवले आहे.

Video | तरुणीला वाटलं तो शाहरुखसारखा धावत येईल, तिने प्रियकराकडे पाठ केली अन् घोळ झाला, व्हिडीओ पाहाच !
TRUST GAME GIRL VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवर अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे माहितीपूर्ण तर काही व्हिडीओ मनोरंजनात्मक असतात. मजेदार व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून जास्त पसंदी मिळते. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हासुद्धा असाच खळखळून हसवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीला प्रियकरावर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवणे चांगलेच भोवले आहे. (boyfriend cheated his girlfriend in trust game shocking video went viral on social media)

तरुणीचा प्रियकरावर भारीच विश्वास

या व्हिडीओमध्ये एक तरुणी आपल्या प्रियकरासोबत ट्रस्ट गेम खेळत आहे. सुरुवातीला ही तरुणी आपल्या प्रियकराला काहीतरी सांगितलं आहे. त्यानंतर तिने त्याच्याकडे पाठ केल्याचं दिसतंय. तसेच तरुणीने आपला प्रियकर आपल्या मागे उभा आहे. मी खाली पडल्यानंतर तो मला पकडेल असे तिने गृहीत  धरले आहे. त्यानंतर काही क्षणात या तरुणीने आपल्या प्रियकराकडे पाठ करत खाली अंग सोडून दिले आहे.

प्रियकर दुसऱ्या तरुणीसोबत निघून गेला

मात्र, यावेळी तरुणीसोबत मोठा घोळ झालाय. तरुणीने आपल्या प्रियकरावर विश्वास ठेवून खाली जमिनीवर अंग सोडून दिले आहे. मात्र, ऐनवेळी तरुणीच्या प्रियकराने दुसऱ्या एका तरुणीचा हात धरला आहे. तसेच दुसऱ्या तरुणीसोबत हा प्रियकर निघून गेलाय. प्रियकर मागे उभा नसल्यामुळे अंग जमिनीवर टाकून देणारी तरुणी खाली जोरात पडली आहे. खाली पडल्यामुळे तिला चांगलेच लागले आहे. याच घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुळात तरुणी जो ट्रस्ट गेम खेळत आहे, त्यामध्ये तरुणीच्या प्रियकराने तिला पकडण्यासाठी तसेच तिच्या मदतीसाठी धावत जाणे अपेक्षित होते. मात्र, प्रियकराने कानाडोळा केल्यामुळे ही तरुणी धाडकन खाली पडली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलाय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच या व्हिडीओला लाईक आणि शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | ICSE, ISC बोर्डाचा 10 वी,12 वीचा निकाल जाहीर, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Video | घनदाट जंगलातून वाहनांची ये-जा, मध्येच अस्वलं आलं, पुढे काय झालं ? एकदा पाहाच !

Video | ऑनलाईन क्लास बंद, शाळेत जावे लागणार म्हणून चिमुकलीचे नाटक, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

(boyfriend cheated his girlfriend in trust game shocking video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI