Video | ICSE, ISC बोर्डाचा 10 वी,12 वीचा निकाल जाहीर, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र, वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. याच चर्चेवरुन सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मिम्स फिरत आहेत.

Video | ICSE, ISC बोर्डाचा 10 वी,12 वीचा निकाल जाहीर, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
ICSE ISC reslut

मुंबई : सीआयएससीई बोर्डाचा दहावी तसेच आयएससी म्हणजेच 12 वी वर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी आयसीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल हा 99.98 टक्के लागला आहे. तर आयएससीचा निकाल हा 99.76 टक्के लागला आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. याच चर्चेवरुन सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मीम्स फिरत आहेत. (icse class 10 and isc 12 class 12 result declared see funny reactions on social media)

निकाल जाहीर झाल्यानमंतर मीम्सचा पाऊस

निकाल जाहीर झाल्यानंतर काही मुलं हे आनंदी आहेत तर काही मुलांना दु:ख झाले आहे. मनासारखे मार्क्स न मिळाल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर #ICSE आणि #icseresult हा हॅशटॅक ट्रेंडिंगवर आला आहे. या हॅशटॅगखाली नेटकरी उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहेत. या निकालानंतर शेअर करण्यात आलेले काही मीम्स तर खळखळून हसवणारे आहेत.

दरम्यान, सध्याची कोरोना महामारी आणि संभाव्य संसर्ग लक्षात घेऊन इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अशा परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य होणार नाही असे ठरवत विद्यार्थ्यांचे योग्य पद्धतीने मूल्यांकन करुन त्यांचे निकाल जारी करण्यात आले आहेत.

इतर बातम्या :

Video | शॉपिंग मॉलमध्ये अचानकपणे दिला धक्का, आजीबाईंनी माणसाला चांगलाच धडा शिकवला, नेमकं काय केलं ?

Video | इंदुरची बातच न्यारी, खाली आग वर तवा, ‘फायर डोशाची’ रेसिपी एकदा पाहाच !

Video | ऑनलाईन क्लास बंद, शाळेत जावे लागणार म्हणून चिमुकलीचे नाटक, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

(icse class 10 and isc 12 class 12 result declared see funny reactions on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI