VIDEO : आई शिकवत होती छोट्या मुलाला पोहायला, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा पाराच चढला; वाचा का?

जगातील प्रत्येक पालकांची इच्छा असते की, त्यांच्या मुलाने इतर मुलांपेक्षा हुशार आणि पूर्णपणे वेगळे असले पाहिजे. म्हणूनच प्रत्येक पालक लहान वयातच आपल्या मुलांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करतात.

VIDEO : आई शिकवत होती छोट्या मुलाला पोहायला, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा पाराच चढला; वाचा का?
लहान मुलाला पोहायला शिकवतानाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : जगातील प्रत्येक पालकांची इच्छा असते की, त्यांच्या मुलाने इतर मुलांपेक्षा हुशार आणि पूर्णपणे वेगळे असले पाहिजे. म्हणूनच प्रत्येक पालक लहान वयातच आपल्या मुलांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करतात. जेणेकरून आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर तो यशस्वीपणे मात करू शकेल. आपण पाहतो की, अगदी कमी वयातच पालक आपल्या मुलांनी डान्स, गाणे, क्रिकेट आणि पोहणे शिकवतात. (Mother giving swimming lessons to kid video goes viral)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये आई आपल्या मुलाला पोहायला शिकवत आहे. इंस्टाग्रामवर Weird Vidz नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडीओ बघितल्यानंतर लोक अवाक् झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक लहान बाळ आहे आणि आई त्याला पोहायला शिकवत आहे. मुलाला पोहायला यावे म्हणून तिने मुलाचे हात-पाय सोडून त्याला पाण्यात सोडले.

 

View this post on Instagram

 

A post shared by WEIRD Vidz (@weirdvidz)

हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. मात्र, हा व्हिडीओ बघून नेटकऱ्यांचा पाराच चढला आहे. सोशल मीडियावरील बरेच लोक म्हणतं आहेत की, इतक्या लहान मुलाला स्विमिंग पूलमध्ये नेण्याचा काय अर्थ आहे, ते त्यांच्यासाठी समजण्यासारखे नाही. त्याच वेळी काहींना या मुलाची आई या मुलासोबत वागत आहे हे चुकीचे आहे, असे वाटत आहे. तर काहींना हा व्हिडीओ आवडला देखील आहे. ते म्हणतात की मुलांना पोहायला शिकवण्याचे हे सर्वोत्तम वय आहे आणि ही पद्धत देखील चांगली आहे.

संबंधित बातम्या : 

Video | शॉपिंग मॉलमध्ये अचानकपणे दिला धक्का, आजीबाईंनी माणसाला चांगलाच धडा शिकवला, नेमकं काय केलं ?

Video | इंदुरची बातच न्यारी, खाली आग वर तवा, ‘फायर डोशाची’ रेसिपी एकदा पाहाच !

VIDEO | नाशकात फ्री स्टाईल हाणामारी, सोसायटी अध्यक्ष-सचिवांनी महिलेला मारहाण केल्याचा आरोप

(Mother giving swimming lessons to kid video goes viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI