Video | खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी हत्तीची धडपड, पण ऐनवेळी गावकरी आले, पुढे काय झालं ? एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये एक हत्ती पाण्याच्या खड्ड्यात पडला आहे. खड्ड्यात पडल्यामुळे त्याची चांगलीच परवड झाली आहे. मात्र, या हत्तीच्या मदतीसाठी ग्रामस्थ चांगलेच धावून आले आहेत. या

Video | खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी हत्तीची धडपड, पण ऐनवेळी गावकरी आले, पुढे काय झालं ? एकदा पाहाच
Elephant-Saved-By-People-News

मुंबई : आपल्या भोवती अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी असतात. या प्राण्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे प्राणी आपल्याला कधी संकटात सापडलेले दिसतात. तर त्यांची धम्माल मस्ती आपल्याला वेगवेगळ्या व्हिडीओंमध्ये दिसते. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ मात्र काहीसा हृदयस्पर्शी आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती पाण्याच्या खड्ड्यात पडला आहे. खड्ड्यात पडल्यामुळे त्याची चांगलीच परवड झाली आहे. मात्र, या हत्तीच्या मदतीसाठी ग्रामस्थ चांगलेच धावून आले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (elephant who falls in pit is been rescued by villagers video went viral on social media)

हत्तीला खड्ड्याच्या वर येता येत नाहीये

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक हत्ती दिसत आहे. हा हत्ती एका खड्ड्यात पडलाय. या खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे. याच पाण्यामुळे खड्ड्यातील सर्व भाग ओला झाला आहे. परिणामी या हत्तीला खड्ड्याच्या वर येता येत नाहीये. खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी तो कसोशीने प्रयत्न करतो आहे. मात्र, त्याला यश मिळत नाहीये.

खड्ड्यातून बाहेर पडण्याचा हत्तीचा प्रयत्न

हत्तीची ही धडपड पाहून आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून गेले आहेत. त्यांनी खड्ड्यात पडलेला हत्ती पाहून त्याची सुटका करण्याचे ठरवलेय. त्यानंतर कित्येक लोक हत्तीला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी जमेल त्या मार्गाने प्रयत्न करत आहेत. हत्तीला बाहेर काढण्यासाठी माणसांनी खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हा हत्ती पुन्हा खड्ड्यात पडू नये म्हणून एका मोठ्या लाकडाचा उपयोग केला आहे.

हत्तीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी

हत्ती खड्ड्यात पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी माणसांनी चांगलेच प्रयत्न केले आहेत. बचावकार्याचा हा प्रसंग पाहण्यासाठी बऱ्याच लोकांनी गर्दी केली आहे. त्यांचा आरडाओरडा आपल्याला स्पष्टपणे ऐकायला येत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, खड्ड्यातून बाहेर पडल्यानंतर हत्तीने एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसेच ओरडत त्याने जंगलात पळ काढला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबात माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला सध्या आयएफएस अधिकारी Parveen Kaswan यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. या व्हिडीओची चांगलीच चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

VIDEO : आई शिकवत होती छोट्या मुलाला पोहायला, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा पाराच चढला; वाचा का?

वयाच्या 22 व्या वर्षी 11 मुलं, करोडो रुपयांची संपत्ती असलेल्या जोडीला हवे आहेत तब्बल 105 मुलं !

Video | ऑनलाईन क्लास बंद, शाळेत जावे लागणार म्हणून चिमुकलीचे नाटक, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

(elephant who falls in pit is been rescued by villagers video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI