
असे अनेक लोक आहेत ज्यांना विसरण्याची सवय असते. ते कुठेतरी जातात तेव्हा ते त्यांच्या मौल्यवान वस्तूंपैकी एखादी वस्तू विसरून येतात, विस्मरण फार वाईट! पण तुम्ही कधी ऐकले आहे का की कोणीतरी आपल्या पत्नीलाच विसरून आलं? असाच एक धक्कादायक प्रकार थायलंडमधून समोर आला आहे. जिथे एक जोडपे गाडीने कुठेतरी जात होते. पण वाटेत नवरा बायकोला विसरून 160 किलोमीटर पुढे निघून गेला . पत्नीने जेव्हा तिच्या नवऱ्याला फोन केला तेव्हा तो गाडीतही नसल्याचे तिच्या लक्षात आले.
हे विचित्र प्रकरण थायलंडच्या महासरखाम प्रांतातील आहे. ख्रिसमसच्या दिवशी, 55 वर्षीय बूंटोम चाईमून आपली पत्नी इमुने चाइमूनसह कार घेऊन बाहेर पडले.
रात्री उशिरा 3 वाजता पत्नी शौचालयासाठी गाडीतून खाली उतरली. पुढच्याच क्षणी बायको गाडीत बसल्याचं बूंटोमला वाटलं. या गैरसमजातून तो त्यांना निर्जन रस्त्यावर सोडून 100 मैल पुढे गेला.
दरम्यान, घाबरलेली पत्नी 20 किलोमीटर चालत राहिली. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास तिने पोलीस ठाण्यात सर्व प्रकार सांगितला. यानंतर बूंटोम यांच्याशी अनेकवेळा फोनवर संपर्क साधण्यात आला, मात्र तो आला नाही.
यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आता सकाळचे 8 वाजले होते, पण बूंटोमला तेव्हा सुद्धा कल्पना नव्हती की तो त्याच्या बायकोशिवाय गाडी चालवत आहे.
यानंतर कसातरी पोलिसांना बूंटोमशी संपर्क साधता आला. तोपर्यंत तो 160 किलोमीटर दूर गेला होता. बूंटोम परतल्यावर, पोलिसांनी त्याला विचारले की इतक्या लांबच्या प्रवासात त्याने आपल्या पत्नीला का पाहिले नाही, तेव्हा तो खजील झाला.
तो म्हणाला, ‘मला वाटलं ती मागच्या सीटवर झोपली आहे.’ मात्र, जेव्हा तो माणूस त्याच्या पत्नीकडे पोहोचला तेव्हा त्याने आपल्या निष्काळजीपणाबद्दल माफी मागितली. पत्नी देखील खूप उदार होती, तिने यासाठी आपल्या पतीशी भांडण केले नाही. इमुने म्हणाले, आमच्या लग्नाला 27 वर्षे झाली आहेत. 26 वर्षांचा एक मुलगाही आहे.