काय म्हणावं आता! नवरा बायको भांडता भांडता गॅलरीचं रेलिंग तोडून, व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

पती-पत्नीतील वाद कधी कधी भयंकर रूप धारण करतात. नुकताच असाच एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात पती-पत्नी इतके भांडतात की दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होतो.

काय म्हणावं आता! नवरा बायको भांडता भांडता गॅलरीचं रेलिंग तोडून, व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद
Husband wife fight
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 23, 2023 | 11:56 AM

पती-पत्नीतील वाद कधी कधी भयंकर रूप धारण करतात. अशा वेळी खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. नुकताच असाच एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात पती-पत्नी इतके भांडतात की दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. असाच एक प्रकार व्हिडिओमध्ये घडला आहे जेव्हा दोघे भांडताना बाल्कनीतून खाली पडले. हा व्हिडिओ नुकताच एका युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ रशियाच्या सेंट पीटर बर्गचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडिओ जुना असून तो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या वेळेची पुष्टी झालेली नाही परंतु हा खरोखर धोकादायक व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोघेही भांडताना वरून खाली पडतात. हा व्हिडीओ बघून हसावं की रडावं असा तुम्हाला प्रश्न पडेल.

व्हिडिओच्या सुरुवातीच्या भागात एक जोडपं बाल्कनीत अतिशय भयंकर पद्धतीने भांडताना दिसत आहे. यावेळी बाल्कनीचे रेलिंग तुटते आणि दोघेही रेलिंगवरून खाली पडतात. इतकंच नाही तर दोघंही इतक्या वेगाने पडतात की मारहाणीचा आवाज येतो. पडल्यानंतर दोघेही बेशुद्ध झालेले दिसतात.

लोक याकडे धडा म्हणून पाहतात!

तिथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याने हा सगळा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि नंतर व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक याकडे “भांडणाऱ्या लोकांना चांगलाच धडा” म्हणून पाहत आहेत, तर काही लोक यावर व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला सल्लाही देत आहेत की त्यांनी पती-पत्नीला ताबडतोब मदत करायला हवी होती.

सध्या या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत, एका युजरने हा जुना व्हिडिओ असल्याचा दावा केला आहे. तर एका युजरने लिहिलं की, या कपलमध्ये असं भांडण व्हायला नको होतं.