
सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. परंतू विवाह करताना काळजीपूर्वक आतीषबाजी करावी लागते. कारण कोणती घटना कोणत्या अपघाताला आमंत्रण देईल हे काही सांगता येत नाही. बंगलुरु येथे एका कपलची हळदीचा कार्यक्रम सुरु असताना त्यांनच्या एण्ट्रीसाठी कलर गन आणि हायड्रोजनचे फुगे वापरणे या कपलला महागात पडले. थोडक्यात निभावले अन्यथा गंभीर जखमा झाल्या असत्या. त्यांची ग्रँड एण्ट्रीसाठी कलर गनचा वापर करताना कलर गनने हायड्रोजन फुग्यांचा ब्लास्ट झाल्यानंतर उष्णतेने या फुग्यांचा मोठा ब्लास्ट झाला. त्यामुळे वधू आणि वराला या ब्लास्टच्या उष्णतेची मोठी झळ बसली.
कपलने या संदर्भात इंस्टाग्राम पोस्टवर लिहिलंय की त्यांनी कधी विचारच केला नव्हता अशा आनंदाच्या क्षणी असा अपघात होईल. त्यांनी एण्ट्री आधीच ग्रँड होण्यासाठी तयारी आधीच केली होती. आधी हायड्रोजन फुगे उडवायचे होतो नंतर कलर गन्स चालवायची होती.
गडबडीत कोणी तरी चुकीने कलर गन फुग्यांच्या दिशने केली. त्यामुळे उष्णता वाढून हायड्रोजन फुग्यांचा मोठा धमाका झाला. हा प्रसंग घाबरवणारा होता. त्यामुळे वधू तन्याच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर आगीने भाजले. तर वर कुशाग्र याचा हात आणि पाठ भाजली. दोघांचे केसही जळून गेले.
कपलने आपली व्यथा पोस्ट करताना लिहिलेय की त्यांनी या क्षणाची अनेक वर्षे वाट पाहिली होती. सुंदर कपड्यांत त्यांना नटून थटून हा अनमोल क्षण साजरा करायचा होता. परंतू त्या दिवशी त्यांना त्यांच्या जखमा लपवण्यासाठी मेकअप करावा लागला. त्यांना जळालेले केस कापावे लागले. त्यांना कलर लावून लपवावे लागले.
तन्या आणि कुशाग्र यांनी सांगितले की डॉक्टरांची मदत वेळीच मिळाल्याने मोठी दुखापत टळली. कुटुंबातील सदस्य डॉक्टर असल्याने आणि जवळ रुग्णालय असल्याचे ते वाचले. त्यांच्यावर लागलीच उपचार झाले.
हा अपघात होऊन ही विवाहाचे विधी थांबले नाहीत. त्यांनी शो मस्ट गो ऑन करावे लागले. आणि त्यांचे शुभमंगल सावधान झाले. पोस्टच्या शेवटी त्यांनी म्हटले की कोणतीही व्हायरल कृती करण्यापूर्वी आधीत आपल्या जीवाची नीट काळजी घ्यायला हवी. सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात आपण आपला जीव धोक्यात घालू नये.
येथे पाहा व्हिडीओ –