AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयंकर अपघातानंतरही थांबला नाही विवाह, ICUमध्ये वराने वधूच्या भांगेत भरले कुंकू, Video

अनेकदा विवाहापूर्वी काही घटना घडल्या तर विवाह रद्द केले जातात, पुढे ढकलले जातात. मात्र, एका जोडप्याचा विवाह चक्क हॉस्पिटलच्या बेडवर झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

भयंकर अपघातानंतरही थांबला नाही विवाह, ICUमध्ये वराने वधूच्या भांगेत भरले कुंकू, Video
Image Source : IG/@REELTALKINDIA
| Updated on: Nov 23, 2025 | 7:48 PM
Share

केरळात एका अनोख्या विवाहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत लग्नाची घटीका एका भावूक क्षणात बदलली जेव्हा लग्न होण्याची अवघ्या काही तास आधी वधूचा अपघात झाला. त्यामुळे हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डात वराने अत्यंत हृदय हेलावणाऱ्या क्षणी वधूच्या भांगेत कुंकू भरले. कोच्चीच्या अलप्पुझा येथील शालेय शिक्षिका अवनी हिचा विवाहाची तयारी सुरु होती. त्याच वेळी वधू मेकअप वगैरे तयारी करुन कारने येत होती त्याच वेळी तिच्या कारला मोठा अपघात झाला. तिला लेकशोर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. ती जखमी होती तरी दोन्ही कुटुंबाने लग्न पुढेढकल्याचा निर्णय घेतला. कारण हा दिवस त्यांच्यासाठी खास होता. यावेळी नाकाला नळी लावलेली वधू बेडवर उपचार घेत होती आणि वराने तिच्या भाळी कुंकू लावून हे लग्न केले.

यावेळी अवनी हीचे मिस्टर प्रोफेसर शेरोन व्हीएम यांनी सांगितले की लग्नाचा मुहूर्त टळू नये यासाठी हा विवाह करण्यात आला. कोणत्याही संगीताशिवाय तसेच सजावटी शिवाय हे लग्न करण्यात आले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी या दिवसाचे महत्व ओळखून या अनोख्या विवाहाला मंजूरी दिली.

असा झाला अपघात

इंस्टाग्रामवरील पोस्ट  reeltalkindia नावाच्या हँडलन शेअर केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल बातमीत केलेल्या दाव्यानुसार हा अपघात विवाहाच्या दिवशी पहाटे तीन वाजता झाला. जेव्हा अवनी काही नातेवाईकांसोबत ब्रायडल मेकअप करण्यासाठी कुमारकोम येथे जात होती. तिच्या कार चालकाचे नियंत्रण चुकल्याने कार एका झाडाला जाऊन ठोकरली. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने सर्व जखमींना कोट्टायम मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. अवनी हिच्या माकड हाडाला दुखापत झाल्याने तिला नंतर विशेष उपचारासाठी ७० किमी दूरवरील एर्नाकुलम येथील लेकशोर रुग्णालयात आयसीयूत दाखल केले गेले.

चित्रपट विवाहसारखे झाले लग्न

अपघातानंतर वर प्रोफेसर शेरोन व्हीएम रुग्णालयात पोहचले. त्यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की ते विवाह ठरवलेल्या वेळीच करु इच्छीत आहेत. डॉक्टरांनी सल्लामसलत केल्यानंतर आपत्कालिन विभागात एका साध्या पद्धतीने हा विवाह झाला. यावेळी अवनी हिला काही काही त्रास होऊ नये याची काळजी घेतली गेली. या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना शाहीद कपूर आणि अमृता राव यांचा साल २००६ च्या विवाह या प्रसिद्ध चित्रपटाचा सीन आठवला.

युजर्सच्या प्रतिक्रीया

या व्हिडीओवर युजर्सने प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने लिहीलेय की या प्रकारचे प्रेम मला विवाह सिनेमाची आठवण करुन देत आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की,खरे प्रेम आणि माणूसकी अजूनही जीवंत आहे. तिसऱ्या युजरने पोस्ट केलीय की विवाह मुव्ही वास्तविक जीवनात घडली. तर एका युजरने लिहीलेय की अरे तिला बरे तरी होऊ द्या. हॉस्पिटलच्या बेडवर लग्न करण्याची एवढी घाई का ? किती अजब दिसत आहे. जर प्रेम खरे आहे तर त्याला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. असे अजब प्रकार केवळ भारतात घडू शकतात असेही त्याने म्हटले आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

(डिस्क्लेमर : या बातमीत दिलेली माहिती सोशल मीडियावरील दाव्यांवर आधारित आहे. टीव्ही 9 मराठी याला माहितीला कोणताही दुजारो देत नाही.)

ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.