
मुंबई : वाढदिवस, काही खास प्रसंग आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आपण सर्वजणच बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी कायमच जातो. विशेष म्हणजे अनेकांना तर काहीही कारण नसताना देखील रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी जायला कायमच आवडते. अनेक रेस्टॉरंट अत्यंत खास पद्धतीने सजवली देखील जातात. रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचे म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच आवडते. शक्यतो जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना कोणताही नियम नसतो.
सध्या एका रेस्टॉरंटची जोरदार चर्चा ही बघायला मिळतंय. या रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत खास आणि वेगळा नियम हा लागू करण्यात आलाय. या रेस्टॉरंटचा एक अत्यंत मोठा नियम आहे. विशेष म्हणजे तो नियम तुम्ही जर पाळू शकत नसाल तर त्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला प्रवेश देखील दिला जात नाही. त्या नियमाचे पालन हे करावेच लागते.
जर त्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला जेवण्यासाठी जायचे असेल तुम्ही एकटे अजिबात जाऊ शकत नाहीत. कोणत्याही पुरुष तिथे एकटा जाऊन शकत नाही. जर तिथे तुम्हाला जेवण्यासाठी जायचे असेल तर एक महिला तुमच्यासोबत असायलाच हवी, तरच तुम्हाला त्या रेस्टॉरंटच्या आतमध्ये सोडले जाईल. हे एक अत्यंत अनोखे असे रेस्टॉरंट नक्कीच आहे.
हे अनोखे असे रेस्टॉरंट जापानच्या टोकियोमध्ये आहे. या रेस्टॉरंटचे नाव निगेटिव्ह कॅफे अँड बार’ असे आहे. हे रेस्टॉरंट 2020 मध्ये कोरोनाच्या दरम्यान सुरू करण्यात आले. रिपोर्टनुसार या रेस्टॉरंटच्या मालकाने खास हे रेस्टॉरंट नकारात्मक विचारसरणीच्या लोकांसाठी तयार केले आहे आणि त्यांना शांत येऊन बसण्यासाठी हे खास तयार करण्यात आलंय.
या रेस्टॉरंटचा मालक नैराश्याने त्रस्त होता आणि त्याने हे रेस्टॉरंट सुरू केले. त्या रेस्टॉरंटच्या मालकाच्या म्हणण्यानुसार जे नकारात्मक विचारसरणीचे लोक असतात ते मुळात खूप जास्त दयाळू असतात. या रेस्टॉरंटची सर्वात खास बाब म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये आपण बाहेरील जेवण देखील आरामात घेऊन जाऊ शकता आणि खाऊ शकता. या रेस्टॉरंटमध्ये पॉझिटिव्ह लोकांना जेवणास बंदी असल्याची देखील चर्चा आहे.
तुम्ही बाहेरील जेवण आणून त्या रेस्टॉरंटमध्ये खाऊ शकतात. फक्त तुम्हाला तिथे एक ड्रिंक घेणे आवश्यक आहे. साधारणपणे 172 रूपये त्या ड्रिंकची किंमत असेल. या रेस्टॉरंटचे नियम ऐकून या रेस्टॉरंटची जोरदार चर्चा ही जगभरात सुरू आहे. अनेकांनी तर थेट या खास रेस्टॉरंटला भेट देण्याची इच्छा देखील थेट पणे जाहिर केली आहे.