AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: भारतच नव्हे, लंडनच्या ट्रेनमध्येही विकले जातात समोसे! विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पहा

Video: सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील ट्रेनमधील एक फोटो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक भारतीय व्यक्ती ट्रेनमध्ये समोसे विकताना दिसत आहे. ही व्यक्ती धोतर, कुर्ता घालून समोसे विकत आहे. ते पाहून सर्वांना आनंद झाला आहे.

Video: भारतच नव्हे, लंडनच्या ट्रेनमध्येही विकले जातात समोसे! विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पहा
SamosaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 02, 2026 | 1:56 PM
Share

समोसा हे असे फास्ट फूड आहे, जे भारताच्या कानाकोपऱ्यात मिळते. लोकही आवडीने समोसा खातात. तुम्ही छोट्या बाजारात जा किंवा मोठ्या बाजारात किंवा ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर ट्रेनमध्ये, समोसा तुम्हाला सर्वत्र मिळेल. पण तुम्हाला माहिती आहे का की आता लंडनच्या ट्रेनमध्येही भारताचे समोसे मिळू लागले आहेत? होय, सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे भारतीय आनंदित झाले आहेत आणि त्याचे कारण आहे समोसा. खरे तर, लंडनच्या एका ट्रेनमध्ये भारताचा प्रसिद्ध समोसा विकला जाताना दिसतो आहे. हे पाहून लोक केवळ आश्चर्यचकितच झाले नाहीत तर त्यांना अभिमानही वाटत आहे.

लंडनमध्ये बिहारी समोसे वाला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची सुरुवात लंडनच्या एका रेल्वे प्लॅटफॉर्मपासून होते. या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसते आणि तिथेच एक भारतीय व्यक्ती पूर्ण देसी स्टाइलमध्ये धोतर आणि कुर्ता घालून, तसेच डोक्यावर गमछा बांधून समोसे विकताना दिसतो. मग ट्रेन येते आणि प्लॅटफॉर्मवर थांबताच तो समोसे घेऊन त्यात चढतो आणि विकायला सुरुवात करतो. ट्रेनमध्ये असलेल्या अनेक प्रवाशांनी त्याचे समोसे विकत घेतले, ज्यात भारतीयही होते आणि त्यांनी समोस्यांची खूप प्रशंसा केली. समोसे विकणारी ही व्यक्ती स्वतःला बिहारी समोसे वाला सांगताना दिसत आहे. हा बिहारी समोसेवाला आता लंडनमध्येही प्रसिद्ध झाला आहे.

कोण आहे हा बिहारी समोसेवाला?

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर biharisamosa.uk नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत १० मिलियन म्हणजे १ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच जवळपास ५ लाख लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की ‘आता लंडनमध्येही समोसा मिळतोय, याहून मोठा आनंद काय असू शकतो.’ दुसऱ्या एका यूजरने, ‘समोसा आता आंतरराष्ट्रीय स्टार झाला आहे’ असे म्हटले. तर दतिसऱ्या एका युजरने हेही विचारले की ‘लंडनच्या ट्रेनमध्ये हे सर्व विकण्याची आणि खाण्याची परवानगी आहे का?’ आणखी एका युजरने कमेंट करत, ‘मला वाटतं त्याने लंडनची ट्रेन भारतीय ट्रेन समजली होती’ असे म्हटले आहे.

भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा.
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?.
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन.
UTS ॲप बंद! लोकल तिकीट अन पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?
UTS ॲप बंद! लोकल तिकीट अन पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?.
हे काय भयानकच प्रकरण! चक्क उमेदवारी अर्जच गिळला... पुण्यात चाललंय काय?
हे काय भयानकच प्रकरण! चक्क उमेदवारी अर्जच गिळला... पुण्यात चाललंय काय?.
पुण्यात गुन्हेगारांना तिकीट अन् अजित पवार यांची सारवासारव
पुण्यात गुन्हेगारांना तिकीट अन् अजित पवार यांची सारवासारव.
नाशिकनंतर पुण्यात दादांची NCP अन् शिंदे सेना भाजपविरोधात एकत्र येणार?
नाशिकनंतर पुण्यात दादांची NCP अन् शिंदे सेना भाजपविरोधात एकत्र येणार?.
सायनमध्ये AB फॉर्मचा झोल अन् भाजप उमेदवारच नॉट रिचेबल
सायनमध्ये AB फॉर्मचा झोल अन् भाजप उमेदवारच नॉट रिचेबल.
मुंबई महापौर पदावरून राजकीय रणकंदन, वारिस पठाण यांच्या विधानानं वाद
मुंबई महापौर पदावरून राजकीय रणकंदन, वारिस पठाण यांच्या विधानानं वाद.
भाजपच्या ट्रोलिंगनं पूजा मोरेंची माघार अन् रडारड... जुने Video व्हायरल
भाजपच्या ट्रोलिंगनं पूजा मोरेंची माघार अन् रडारड... जुने Video व्हायरल.