IPS Officer ने दाखवला आपला आलिशान सरकारी बंगला, Video

2013 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अभिषेक पल्लव यांच्या सरकारी घराचा गार्डन एरिया मोठा आहे. त्याच्या मधोमध एक शेड आहे.

IPS Officer ने दाखवला आपला आलिशान सरकारी बंगला, Video
IPS Officer House Tour
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 19, 2022 | 11:49 AM

आयएएस आणि आयपीएसच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बाबी जाणून घेण्यात लोकांना रस असतो. आयपीएस अभिषेक पल्लव यांच्या सरकारी निवासस्थानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला, जो लोकांना खूप आवडतोय.

आयपीएस अभिषेक पल्लव यांच्या सरकारी निवासस्थानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यात त्यांचं आलिशान घर दाखवण्यात आलंय. आयपीएस एका मजली बंगल्यात राहतात. बंगल्यात मोठा गार्डन एरिया आणि त्यात ट्री हाऊसही आहे. 2013 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अभिषेक पल्लव सध्या दुर्ग जिल्ह्याचे एसपी आहेत.

एका यूट्यूब व्हिडीओमध्ये आयपीएस अभिषेक पल्लव यांनी स्वत: होम टूर केली आहे. आयपीएस निवासस्थान मोठ्या जागेत आहे. व्हिडिओमध्ये आयपीएस अभिषेक प्रवेशद्वारातून आत आलेत. बंगल्याच्या गॅलरीत एक झुलाही दिसतो. बंगल्याच्या समोरच गार्डन एरिया आहे. इथे कुंडीतली झाडं सुद्धा दिसतात.

2013 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अभिषेक पल्लव यांच्या सरकारी घराचा गार्डन एरिया मोठा आहे. त्याच्या मधोमध एक शेड आहे ज्या शेड खाली सिटींग एरियाही आहे, ज्याच्या आजूबाजूला हिरवळ दिसते.

गार्डनमध्ये झोकाही आहे, इथे बसून आयपीएस वर्तमानपत्रं वाचतात. गार्डनमध्ये ट्री हाऊसही दिसते. त्यावर जाण्यासाठी शिडीही बसविण्यात आली आहे.

आयपीएसचं हे घर खूपच आलिशान आणि सुंदर दिसतं. दंतेवाडा एसपी म्हणून काम केल्यानंतर त्यांना हा बंगला मिळाला. आयपीएस अभिषेक पल्लव देखील त्याच्या कामासाठी खूप लोकप्रिय आहेत.