VIDEO | एका मुख्यमंत्र्याच्या नातीच्या लग्नात जेव्हा दुसरा माजी मुख्यमंत्री ठुमके लावतो…

'आज कल तेरे-मेरे प्यार के चर्चे हर जबान पर' या गाण्यावर फारुक अब्दुल्ला यांनी जमके डान्स केला. (Farooq Abdullah dance video)

VIDEO | एका मुख्यमंत्र्याच्या नातीच्या लग्नात जेव्हा दुसरा माजी मुख्यमंत्री ठुमके लावतो...
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचा डान्स
| Updated on: Mar 05, 2021 | 8:22 AM

नवी दिल्ली : राजकीय नेत्यांचं वैयक्तिक आयुष्यही सर्वसामान्यांप्रमाणे असतं, याचा प्रत्यय अनेक वेळा येतो. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लेकीच्या साखरपुड्यात तिचे लाड करतानाचा व्हिडीओ नुकताच सर्वांनी पाहिला. आता जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांच्या नातीच्या लग्नात चक्क जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी ठुमके लगावले. (Jammu Kashmir former CM Farooq Abdullah dance in Captain Amarinder Singh Grand daughter wedding video social media viral)

अमरिंदर सिंह यांच्या नातीचं लग्न

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नातीचं लग्न रविवारी झालं. या सोहळ्याला राष्ट्रीय राजकारणातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. वधू-वराला आशीर्वाद देण्यासाठी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्लाही पोहोचले होते.

फारुक अब्दुल्ला यांना राहवेना

लग्न सोहळ्यात सर्वत्र जल्लोषाचं वाातवरण होतं. लग्नस्थळी छानसं संगीत वाजत होतं. संगीत ऐकून फारुक अब्दुल्ला यांना राहावलं नाही. अब्दुल्लांनी सुरुवातीला पायाने ठेका धरला. हळूहळू त्यांची लय वाढली आणि त्यांनी ठुमके लगावले. विशेष म्हणजे फारुक अब्दुल्ला यांना ताल धरताना पाहून कॅप्टन अमरिंदर सिंहही तिथे आले आणि त्यांना साथ दिली.

आज कल तेरे-मेरे प्यार के चर्चे

‘आज कल तेरे-मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, सब को मालूम है और सब को खबर हो गयी.. तो क्या’ या लाईव्ह ऑर्केस्ट्रातील गाण्यावर फारुक अब्दुल्ला यांनी जमके डान्स केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. अनेक नेटिझन्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ :

(Jammu Kashmir former CM Farooq Abdullah dance in Captain Amarinder Singh Grand daughter wedding video social media viral)

सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

संबंधित बातम्या :

VIDEO | पापा मैं तेरी मलिका, तुकडा हू तेरे दिल का, संजय राऊतांचा लेकीसोबत गोड व्हिडीओ

VIDEO | जेव्हा सुनेत्रा अजित पवार गातात… लाख मना ले दुनिया… साथ न ये छुटेगा

(Jammu Kashmir former CM Farooq Abdullah dance in Captain Amarinder Singh Grand daughter wedding video social media viral)