VIDEO | पापा मैं तेरी मलिका, तुकडा हू तेरे दिल का, संजय राऊतांचा लेकीसोबत गोड व्हिडीओ

संजय राऊतांच्या कन्येच्या साखरपुड्याला विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. (Sanjay Raut Daughter Engagement Video)

VIDEO | पापा मैं तेरी मलिका, तुकडा हू तेरे दिल का, संजय राऊतांचा लेकीसोबत गोड व्हिडीओ

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचा साखरपुडा नुकताच झाला. सोहळ्यात वडिलांनी लेकीचे लाड करतानाचा व्हिडीओ सोशल माीडियावर चर्चेत आला आहे. संजय राऊतांनी लेकीचे लाड करतानाचा हा व्हिडीओ आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी संजय राऊत यांची कन्या पूर्वशीचा साखरपुडा झाला. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे. या सोहळ्यात विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. (Sanjay Raut Daughter Purvashi Raut Engagement Viral Video)

राऊत-फडणवीसांची गळाभेट चर्चेत

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हे एकत्रच पूर्वशीच्या साखरपुड्याला पोहोचले. त्यावेळी मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत नार्वेकर कुटुंबीय आणि संजय राऊत यांच्या पत्नी उपस्थित होत्या. फडणवीस आणि दरेकर यांचं आगमन झाल्यानंतर राजेश नार्वेकर यांनी फडणवीसांना नमस्कार केला. फडणवीसांनी पुढे होऊन मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.

दुसरीकडे उभे असलेल्या संजय राऊत यांनी फडणवीसांना पाहिलं आणि ते त्यांच्याजवळ आले. समोरासमोर आल्यानंतर राऊत यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली. ही गळाभेटही चर्चेचा विषय ठरला आहे.

दरेकर-राऊतांचे हातात हात

नव्या जोडप्यासह नार्वेकर आणि राऊत कुटुंबियांसोबत फडणवीसांनी फोटो काढले. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी पुढे होत नव्या जोडप्याला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. तेव्हा राऊतांनीही पुढे होत दरेकरांच्या हातात हात दिला.

राज ठाकरेंच्या अनुपस्थितीची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, साताराचे खासदार श्रीनिवास पाटील, डॉक्टर तात्याराव लहाने, खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्या अनुपस्थितीबाबत विषय निघाला. तेव्हा संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचा हात दुखत असल्याचं आणि तो सुजल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसल्याचं सांगितलं. राज ठाकरे यांची उणीव भासत असल्याचंही संजय राऊत म्हणाले. त्यामुळे अन्य सर्व नेते उपस्थित असताना राज ठाकरे यांच्या अनुपस्थितीची चर्चा राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात रंगल्याचं दिसून आलं. (Sanjay Raut Daughter Purvashi Raut Engagement Viral Video)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

लेकीच्या साखरपुड्यात राऊतांची फडणवीसांशी गळाभेट, चंद्रकांतदादा म्हणतात “दुष्मन असला तरी…”

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात राज ठाकरेंची अनुपस्थिती! चर्चा तर होणारच

(Sanjay Raut Daughter Purvashi Raut Engagement Viral Video)

Published On - 12:20 pm, Wed, 3 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI