लेकीच्या साखरपुड्यात राऊतांची फडणवीसांशी गळाभेट, चंद्रकांतदादा म्हणतात “दुष्मन असला तरी…”

"आपल्या देशाची संस्कृती आहे, दुष्मन जरी असला तरी तो त्या जागी, एरवी आपण एकमेकांना प्रेम देतो" असं चंद्रकांत पाटील म्हणाले. (Devendra Fadnavis Sanjay Raut Hug )

लेकीच्या साखरपुड्यात राऊतांची फडणवीसांशी गळाभेट, चंद्रकांतदादा म्हणतात "दुष्मन असला तरी..."

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा साखरपुडा रविवारी पार पडला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांची गळाभेट घेतली. “शत्रूही एकमेकांची गळाभेट घेतात, दोन मित्र भेटल्यानंतर मिठी मारतात” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. (Chandrakant Patil reacts on Devendra Fadnavis Sanjay Raut Meet Greet Hug in Urvashi Raut engagement)

दुश्मन भी गले मिल जाते है….

“आपल्या देशाची संस्कृती आहे, दुष्मन जरी असला तरी तो त्या जागी, एरवी आपण एकमेकांना प्रेम देतो. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या मुलीच्या साखरपुड्याला जायलाच हवं होतं” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“पवारांना आदराने नमस्कार होणारच”

“राजकीय विषय वेगळे असले तरी स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यावर आपण एकमेकांची गळाभेट घेतो. राजकारणात मैत्री असायलाच हवी, जरी आम्ही पवार साहेबांवर टीका टिपण्णी केली, तरी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर त्यांच्यावर टीका टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही. पवार साहेब भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ही आमची संस्कृती आहे” असंही चंद्रकांतदादा म्हणाले.

संजय राऊतांच्या लेकीचा साखरपुडा

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी संजय राऊत यांची कन्या पूर्वशीचा साखरपुडा झाला. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे. या सोहळ्यात विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी गेल्या वर्षभरात न दिसलेलं चित्र आज पाहायला मिळालं.

राऊत-फडणवीसांची गळाभेट

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे एकत्रच कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यावेळी मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत नार्वेकर कुटुंबीय आणि संजय राऊत यांच्या पत्नी उपस्थित होत्या. फडणवीस आणि दरेकर यांचं आगमन झाल्यानंतर राजेश नार्वेकर यांनी फडणवीसांना नमस्कार केला. फडणवीसांनी पुढे होऊन मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दुसरीकडे असलेल्या संजय राऊत यांनी फडणवीसांना पाहिलं आणि ते फडणवीसांकडे आले. दोघेही समोरासमोर आल्यानंतर राऊत यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली. (Chandrakant Patil reacts on Devendra Fadnavis Sanjay Raut Meet Greet Hug in Urvashi Raut engagement)

दरेकर-राऊतांचे हातात हात

यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. त्यानंतर नव्या जोडप्यासह नार्वेकर आणि राऊत कुटुंबियांसोबत फडणवीसांनी फोटो काढले. त्यानंतर दरेकर यांनी पुढे होत नव्या जोडप्याला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. तेव्हा राऊतांनीही पुढे होत दरेकरांच्या हातात हात दिला.

संबंधित बातम्या :

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात फडणवीस-राऊत गळाभेट! अनेकांच्या भुवया उंचावल्या

संजय राऊतांचा जावई पाहिला का? कन्येच्या साखरपुड्याचे खास फोटो तुमच्यासाठी!

(Chandrakant Patil reacts on Devendra Fadnavis Sanjay Raut Meet Greet Hug in Urvashi Raut engagement)

Published On - 9:24 am, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI